नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार शहरातील चौधरी गल्लीत मागील किरकोळ वादाच्या कारणावरुन सात जणांना मारहाण करुन जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांसह जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील चौधरी गल्ली येथील गौरव (गोलू) प्रविण जव्हेरी व त्यांचे भाऊ साक्षीदार पंकज जव्हेरी यांना मागील किरकोळ वादाच्या कारणावरुन कल्पेश जव्हेरी, निखील अनिल जव्हेरी, तुषार मोरे याच्यासह त्यांच्या सोबत असलेल्यांनी शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण केली.
तसेच निखील जव्हेरी याने साक्षीदार मनिषा यांना जिवेठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर काठीने मारुन दुखापत केली. वैशाली जव्हेरी, आरती जव्हेरी व प्रफुल्ल चौधरी यांना वीट लागल्याने त्यांना दुखापत झाली. तसेच अशोक जव्हेरी भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांच्या छातीस दगड लागून दुखापत झाली. याबाबत गौरव जव्हेरी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात जमावाविरोधात भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१), ३ चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माळी करीत आहेत.








