नंदूरबार l प्रतिनिधी
अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश राज्याध्यक्ष म्हणून आनंदा पाटील यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार शेख अनिस यांनी केली. आनंदा पाटील यांची पुन्हा निवड झाल्याने जिल्ह्यातील संघटनेच्या पाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे .
आनंदा पाटील हे भालेर ता. नंदूरबार येथील रहिवासी आहे त.त्यांनी मागील वर्षापासून जिल्ह्यातच नव्हेतर जिल्ह्याबाहेर दिव्यांग बांधवाना न्याय व विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले त्याच्या कार्याची दखल घेत त्याची महाराष्ट्र प्रदेश राज्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.








