नवापूर | प्रतिनिधी
नवापूर शहरातील अतुल सायकल मार्ट ते महात्मा गांधी पुतळादरम्यान असलेल्या पालिकेने नोटीशी बजावलेल्या १७० दुकानांचे अतिरिक्त अतिक्रमण काढण्यात आले.यावेळी अनेक ठिकाणी दुकादारांसोबत शाब्दिक चकमक झाली.पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात ही मोहिम राबविण्यात आली.

नवापूर शहरातील अतुल सायकल मार्ट ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर वाहतुकीची बेशिस्त पार्किंग व वाहतूक कोंडी होत असल्याने नगर पालिका प्रशासनाने अखेर जेसीबीच्या सहाय्याने दुकानदारांचे अतिरिक्त अतिक्रमण हटविण्यात आल्याची कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली नगर पालिकेने शहरातील मेन रस्त्यावरील अतुल सायकल मार्ट ते महात्मा गांधी पुतळा पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर नेहमी होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता नगर पालिका प्रशासनाने रस्त्याला अडथळा ठरणारे अतिरिक्त केलेले बांधकाम किंवा शेड असतील ते काढून घेण्याबाबत लेखी नोटीस बजावल्या होत्या पंधरा दिवसाच्या आत ओटा,पायर्या,शेड व इतर बांधकाम काडून टाकावे व रस्ता मोकळा करून द्यावा अन्यथा सदरचे रत्यावरील अतिक्रमण नगर परिषद मार्फत काढून टाकण्यात येईल व
त्याकामी झालेला सर्व खर्च आपणाकडून वसूल करण्यात येईल अश्या १७० दुकानदाराना नोटीसा बजावल्या होत्या त्या अनुषंगाने नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी स्वप्नील मुधलवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११ वाजता अतिक्रमण हटाव मोहिलेला सुरुवात करण्यात आली.जेसीबीसह आलेल्या पथकाल पाहून दुकानदारांची चांगलीच भंबेरी उडाली.यावेळी पालिका प्रशासनावर दुकानदारांचा चांगलाच रोष दिसून आला होता.
कारवाई दरम्यान बघ्यांची चांगलीच गर्दी या परिसरात होती.कारवाई दरम्यान अनेक ठिकाणी दुकादारांसोबत शाब्दिक चकमक झाली.तरीही पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात अनेक ठिकाणी दुकानांचे ओटे पायर्या व काही ठकाणी पूर्ण अतिक्रमण असलेल्या लोखंडी टपर्या हटविण्यात आल्या.यावेळी उपस्थित नागरिकांनी नगर पालिके कडून होत असलेल्या कारवाईचा वाहतूक कोंडी दूर होणार नाही अश्या प्रतिक्रिया देत होत्या त्यासाठी नगर पालिका प्रशासनाने पार्किंगच्या ठोस उपाय योजना व पोलीस प्रशासनाने वाहतूक कोंडीवर नियमित नियंत्रण करण्यासाठी बेशिस्त वाहन पार्किंगवर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी स्वप्नील मुधलवाडकर यांच्या सह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे,उपनिरीक्षक अशोक मोकळ, प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार,सतीश बागुल,न.पा.बांधकाम अभियंता सचिन संदानशिव,पाणी पुरवठा अभियंता सचिन अग्रवाल,राहुल बिर्हाडे,सह पालिकेचे कर्मचारी व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.१०८ रुग्णवाहिका,अग्निशमन बंब,दोन जेसीबी यंत्र ट्रॅक्टर आदी सामुग्री या परिसरात तैनात होती








