Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

परवानाधारकांनी शस्त्र पोलीस स्टेशनला जमा करा:  जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री

team by team
January 17, 2023
in क्राईम
0
नायलॉन मांजाची विक्री व वापरास प्रतिबंध : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश
नंदुरबार  l
महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला असून निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू झालेली आहे. या आचारसंहिता कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील शस्त्र परवाना धारकांनी त्यांचेकडील शस्त्रे ते ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतात त्या पोलीस स्टेशनला जमा करावित. असे निर्देश जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिले आहेत.
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणुक मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पडावी. सार्वजनिक उपद्रव, नुकसान, जिवितास व आरोग्यास तसेच सुरक्षितपणास धोका निर्माण होऊ नये आणि मतदारात भय, दहशत निर्माण होवू नये यासाठी समितीची बैठक 9 जानेवारी रोजी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत जे शस्त्र यापुर्वीच जमा असल्याने ते शस्त्र जमा करणेबाबत आदेश पारित करण्याची आवश्यकता नाही. शस्त्र परवानाधारकांपैकी जी शस्त्र परवानाधारक जामिनावर मुक्त झालेली आहेत, जे शस्त्र परवानाधारक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत त्यांनी व निवडणूकीत उमेदवार असलेली व्यक्ती व मतदार असलेल्या व्यक्ती यांच्याकडे शस्त्र परवाना असल्यास त्यांनी आपली शस्त्र जमा करावित.
न्यायाधीश दर्जा, बँकेचे व कॅश वाहतूक करणारे सुरक्षा कर्मचारी, सोने, चांदी व हिरे व्यापारी यांचेकडे असलेले नोंदणीकृत सुरक्षारक्षक व नोंदणीकृत खाजगी सुरक्षारक्षक यांना त्यांचेकडे असलेले शस्त्र जमा करण्यास सुट देण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर शस्त्र बाळगण्यावरील निर्बंध आपोआप रद्द होतील आणि जमा केलेली शस्त्रे परवानाधारकांना मतमोजणीच्या एका आठवड्यानंतर परत करण्यात येतील. विनापरवाना अवैध शस्त्रांचा वापर होणार नाही यासाठी आयोगाच्या निर्देशानुसार पोलिस विभागाने कारवाई करावी, असेही जिल्हादंडाधिकारी श्रीमती खत्री यांनी नमूद केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ; सहा उमेदवारांची निवडणुकीतून माघार, 16 उमेदवार रिंगणात

Next Post

नंदुरबार फर्टिलायझर, पेस्टीसाईडस् सिडस् डिलर्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन 

Next Post
नंदुरबार फर्टिलायझर, पेस्टीसाईडस् सिडस् डिलर्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन 

नंदुरबार फर्टिलायझर, पेस्टीसाईडस् सिडस् डिलर्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add