Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार फर्टिलायझर, पेस्टीसाईडस् सिडस् डिलर्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन 

team by team
January 17, 2023
in राज्य
0
नंदुरबार फर्टिलायझर, पेस्टीसाईडस् सिडस् डिलर्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन 
नंदूरबार l प्रतिनिधी
 खत कंपन्यांकडून होणारे रासायनिक खतासोबतचे लिंकिंग बंद होणे बाबत नंदुरबार फर्टिलायझर, पेस्टीसाईडस् सिडस् डिलर्स असोसिएशनतर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
      या निवेदनात म्हटले आहे की, सध्या अनेक खत कंपन्या रासायनिक खतांच्या सोबत लिंकिंग मटेरियल घेण्यास विक्रेत्यांना भाग पाडत आहेत. लिंकिंग शिवाय कंपन्या खत पुरवठा करण्यास तयार होत नाहीत. शासनाने सुद्धा कंपन्यांना लिंकिंग न करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच विक्रेत्यांना सुद्धा लिंकिंग केल्यास परवाना रद्द करण्याचा इशारा दिलेला आहे.
लिंकिंगमुळे शेतकरी आणि विक्रेते यांच्यात वादविवाद होत आहेत. शेतकर्‍यांना काही प्रमुख रासायनिक खतांच्या ग्रेडची आवश्यकता आहे. मात्र त्या खतांवर लिंकिंग मटेरियल घ्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. व विक्रेत्यांचे व शेतकर्‍यांचे संबंध बिघडत आहेत. विक्रेत्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर आपण स्वतः लक्ष घालून लिंकिंग बंद करण्याविषयी कंपन्यांना कडक सूचना द्याव्यात ही विनंती. तसेच कंपन्यांनी लिंकिंग बंद न केल्यास जिल्ह्यातील सर्व रासायनिक खत विक्रेते बेमुदत आपली दुकाने बंद ठेवतील व शेतकर्‍यांना होणाऱ्या गैरसोयीची संपूर्ण जबाबदारी खत कंपन्यांची राहील असे निवेदनात म्हटले आहे.
      या निवेदनावर निवेदन नंदुरबार फर्टिलायझर्स, पेस्टीसाईडस् सिडस् डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्रसिंग राजपूत, कार्याध्यक्ष कन्हैयालाल पटेल, सचिव राजेशकुमार वाणी आदींच्या सह्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

परवानाधारकांनी शस्त्र पोलीस स्टेशनला जमा करा:  जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री

Next Post

शहाद्यात खोदकामादरम्यान आढळले शिवलिंग

Next Post
शहाद्यात खोदकामादरम्यान आढळले शिवलिंग

शहाद्यात खोदकामादरम्यान आढळले शिवलिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add