शहादा का.प्र.
जीवन साधना विद्याप्रसारक मंडळ लोणखेडा संचलित माध्यमिक विद्यालय बिलाडी त.सा शाळेत आनंद मेळावा साजरा करण्यात आला.
आनंद मेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांकडून विविध पाक कलायुक्त पदार्थ तयार करण्यात आले. त्यात इडली डोसा,उसळ,भेळ,पाववडे,दहिवडे मॅच्युरियन,व्हेज बिर्याणी,पोहे पाणीपुरी,दहिपुरी,खमंग, चाट कटोरी,पॉपकॉर्न ,पास्ता पापड मसाला,आप्पे ,वेफर्स इत्यादी व्यंजन विद्यार्थ्यांनी तयार केले. सर्वप्रथम मान्यवरांच्या उपस्थित प्रतिमापूजन करण्यात आले.
त्यात बिलाडी गावाचे सरपंच जवाहरलाल पाटील, बामखेडा गावाचे सरपंच सखाराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते मधुभाई पाटील,वसंतभाई पाटील, ज्येष्ठ नागरिक रामसिंग गिरासे,बिलाडी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना पाटील, जि.प चे मुख्याध्यापक सचिन पत्की व समस्त गावकरी आरोग्यसेविका,अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पाककलेच्या आलेल्या यजमान गावकरी,जेष्ठनागरिक गावातील लोक,गृहिणी व विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात व्यापार व व्यवहार कसा करावा याचे ज्ञान व्हावे यासाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना पाटील, शिक्षकवृंद मनीषा पाटील,शुभांगी पाटील,सचिन बागले,मिलिंद पगारे,प्रवीण मोरे,हर्षल चौधरी, छोटू सोनवणे व सिद्धार्थ सामुद्रे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.








