शहादा l का.प्र.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला , विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाच्या जनजागृतीसाठी शहादा पोलीस अधीक्षक आर.जी. मोरे व पोलिस विभागातील कर्मचारी युवराज पाटील यांनी महाविद्यालयातील युवकांना सखोल माहिती दिली .
महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील होते.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या कल्पना पटेल, पर्यवेक्षक प्रा.के.एच.नागेश,पोलिस अधिकारी श्री.राजन मोरे, कर्मचारी युवराज पाटील उपस्थित होते.
श्री.मोरे यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले,रस्ता सुरक्षेची जबाबदारी युवा वाहनचालकांची असून सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे .तरुणांनी वाहन चालवतांना निश्चित ठरवून दिलेल्या वेगात चालवले पाहिजे. कर्णकर्कश आवाज देणाऱ्या हॉर्नचा वापर करू नये. यामुळे शाळा, न्यायालय ,व आजारी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.मोटर सायकल धारकांनी हेल्मेटच्या वापर नियमित करावा.
व्यसनापासून दूर रहावे. नियमबाह्य प्रकार केल्यास आपण गुन्ह्यास पात्र राहणार असे मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील यांनी पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे ही निश्चितच कौतुकाची बाब आहे .या निमित्ताने विद्यार्थ्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव होईल. कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.कल्पना पटेल, पर्यवेक्षक प्रा. के.एच नागेश यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रा. मनोज चौधरी यांनी केले.








