मोलगी l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील भगदरीचा खुटंमाळ येथील उगराण्या सत्या वसावे सायसिग उगराण्या वसावे या दोघा वडील व मुलाच्या लागुनच असलेल्या इग्लिश कौलारू घराला शाॅटसर्किटमुळे आग लागुन दोघे घरे जळून खाक झाली.
शुक्रवार दि १३ रोजी दुपारी साडेतीन चार वाजेच्या सुमारास विजेच्या शाॅटसर्किटमुळे आग लागुन दोघे घरे जळाली यावेळी घरातील रोक रकमेसह चांदीचे दोन किलोचे दागिने ,कपाट पंलगासह संसारोपयोगी,लाकडी साहीत्यासह घराला असलेल्या सागवानी मोठे उभे,आडवे खांब, माळ्याला असलेल्या उभे आडवे खांब कड्या पाट्या सह लाकडी उपयोगात असलेले साहीत्य जीवनावश्यक वस्तूंमध्ये मका,ज्वारी, भगर,बंटी,ज्वारी,साळ,चवळी,तुवर, उडीदसह इतर असलेल्या
धान्य ही जळुन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने दोघे कुटुंब उघड्यावर झाले आहे यावेळी घरातील मजुरीला गेले असल्याने बबीताबाई सायसिग वसावे व लहान मुलेच घरी होते मात्र लहान मुले बाहेर खेळत असल्याने ते सुखरूप होते व बबीताबाई घरात एकटीच असल्याने बबीताबाई आगीचे रूद्र रूप पाहुन घाबरून गेल्या होत्या त्यांनी घरातील शेळ्या, गायी व बैलांना सुटका करून बाहेर काढल्याने ते ही वाचले.








