नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील धुळीपाडा ते सोनखडका रस्त्यावर वनविभागाच्या पथकाने अवैध लाकडाची वाहतूक करणाऱ्या एका वाहनासह सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुप्त बातमी वरून सहाय्यक वनसंरक्षक(परिविक्षाधीन) गणेश मिसाळ, वनक्षेत्रपाल चिंचपाडा मंगेश चौधरी व.वनक्षेत्रपाल नवापूर श्रीमती स्नेहल अवसरमल व रेंज स्टाफ चिंचपाडा व नवापूर हे नवापूर तालुक्यातील धुळीपाडा ते सोनखडका रस्त्यावर गस्त करत असतांना संशयित वाहन (क्र. GJ- 09 Y-8321) अडवून तपासणी केली असता, सादडा, मोदल, बोर, हिवर, लाकूड मिळून आले. सदर वाहनाचे मोजमाप घेतले असता अंदाजे 4 घ. मी माल मिळून आला,किंमत 25हजार व वाहन किंमत अंदाजे 3 लाख एकूण मुद्देमाल किंमत 3 लाख 25 हजार असून सदर माल व वाहनास जप्त करुन शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा केले.
यावेळी वनपाल भिवाजी दराडे,वनरक्षक कमलेश वसावे, आशितोष पावरा,रामदास पावरा,कल्पेश अहिरे, संतोष गायकवाड, विकास शिंदे,वनमजूर बाळा गावित, वाहन चालक चामाऱ्या गावित वाहन चालक हे उपस्थित होते.
सदरची कार्यवाही ही वनसंरक्षक धुळे विवेक होशिंग, उपवनसंरक्षक नंदुरबार वन विभाग नंदूरबार कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार (प्रादेशिक व वन्यजीव ) यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरु आहे.








