नंदूरबार l प्रतिनिधी
का. वि.प्र.संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर ता.नंदूरबार विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष सी.बी.पाटील व प्राचार्या सौ. व्ही.बी .चव्हाण यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प हार अर्पण केला.
राजमाता जिजाऊंच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यालयातील विद्यार्थिनींना या राष्ट्र महात्म्यांची ओळख व्हावी, त्यांच्या जीवीतकार्यांतून प्रेरणा मिळावी म्हणून विद्यार्थिनींनी मासाहेब जिजाऊ वर काव्य, ओव्या, पोवाडा व वकृत्व कुमारी ईशा पाटील, कुमारी वेदिका पाटील कुमारी दुर्गेश्वरी माळी यांनी सादर केले व ‘मला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयांवर कुमारी धनश्री विनोद पाटील या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिमेचे पूजन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.








