नंदुरबार l प्रतिनिधी
पोलिसांच्या पुणे येथे झालेल्या ३३ व्या राज्य क्रीडा स्पर्धेत नंदूरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी शूटिंग स्पर्धा या क्रीडा प्रकारात अधिकारी गटातून राज्यात दुसरे स्थान मिळविले.
पोलिसांच्या क्रीडा स्पर्धा पुणे येथे सुरू आहेत. त्यांचा समारोप आज शुक्रवार रोजी होणार आहेत.
पोलिसांच्या पुणे येथे झालेल्या ३३ व्या राज्य क्रीडा स्पर्धेत नंदूरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी शूटिंग स्पर्धा या क्रीडा प्रकारात अधिकारी गटातून सहभागी होत या स्पर्धेत शूटिंग क्रीडा स्पर्धेत यश मिळविले. त्यात गृप फायरमध्ये ब्राँझ पदक, रॅपीड फायर या प्रकारात गोल्ड मेडल, सर्वसाधारण बेस्ट फायरमध्ये सिल्वर पदक मिळविले. पुर्ण शूटिंग क्रीडा प्रकारात त्यांनी दुसरे स्थान मिळविले. पी. आर. पाटील यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.








