शहादा l प्रतिनिधी
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स (आयसीएआय) या देश पातळीवरील स्वायत्त संस्थेच्या वतीने नोव्हेंबर 2022 मध्ये घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेत लोकेश मकरंद पाटील हा यशस्वी झाला आहे.
आयसीएआय या संस्थेमार्फत सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवार दि.10 रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. सीए अंतिम परीक्षेत देशभरातून दोन गटातून सुमारे 29 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 11 टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. लोकेश पाटील याने इंटरमिजिएट तसेच अंतिम परीक्षेत दोन्ही गटातून सुयश संपादित केले आहे.
लोकेश पाटील याने दहावी पावेतोचे शिक्षण लोणखेडा येथील श्री सातपुडा माध्यमिक विद्यालयातून पूर्ण केले असून माटुंगा येथील पोद्दार महाविद्यालयात कॉमर्सचे उच्च शिक्षण घेऊन मुंबई विद्यापीठातून बीकॉमची पदवी प्राप्त केली आहे. तो पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा .मकरंद पाटील व गुर्जरी खाद्य संस्कृती ग्रंथाच्या लेखिका माधवी मकरंद पाटील यांचा सुपुत्र आहे. त्याच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.