नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुकास्तरीय 43 विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन काल झाले. नंदुरबार तालुक्यातील शेजवा येथे विज्ञान प्रदर्शन तालुका विधायक समितीच्या शाळेत भरवण्यात आले.या प्रदर्शनामध्ये गटनिहाय उपकरणे उच्च प्राथमिक गट 39 माध्यमिक माध्यमिक 44 उच्च माध्यमिक गट 17 असे एकूण शंभर उपकरणे शिक्षक गट पाच प्रयोगशाळा परिचर एक लोकसंख्या शिक्षण गट एक असे उपकरणांची मांडणी या प्रदर्शनात ठेवण्यात आली.

या प्रदर्शनाचे उद्घाटन माध्यमिक शिक्षण अधिकारी एम.व्ही.कदम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधायक समितीचे सचिव यशवंत देवराम पाटील हे होते. कार्यक्रमासाठी गट विकास अधिकारी तथा उपशिक्षण अधिकारी निलेश पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेन्द्र रघुवंशी, तालुका विज्ञान प्रदर्शनाचे अध्यक्ष कपूरचे मराठी, सी.डी.पाटील, दत्तू पाटील व परीक्षक उपस्थित होते या प्रदर्शनामध्ये गटनिहाय उपकरणे उच्च प्राथमिक गट 39 माध्यमिक माध्यमिक 44 उच्च माध्यमिक गट 17 असे एकूण शंभर उपकरणे, शिक्षक गट पाच, प्रयोगशाळा परिचर एक, लोकसंख्या शिक्षण गट एक असे उपकरणांची मांडणी या प्रदर्शनात ठेवण्यात आली.

नंदूरबार तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उपकरण आणून प्रदर्शन मध्ये सहभागी नोंदविला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पवार व आनंदराव पवार व कार्यक्रमाचे प्रस्तावना मुख्याध्यापक दत्तू पाटील कार्यक्रमाच्या आभार श्री. मराठे यांनी मानले. यशस्वीतेसाठी माध्यमिक विद्यालय शेजवे, दीपक वळवी, रामानंद बागले,संजय बोरसे, अरुण खा चिखलीकर ,संगीता गोखले, नेहा शर्मा, संजय वसावे आदींनी परिश्रम घेतले.