Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सहकार क्षेत्राला उज्वल भवितव्य प्राप्तीसाठी प्रयत्न – ॲड. कालिदास पाठक

team by team
January 12, 2023
in राज्य
0
सहकार क्षेत्राला उज्वल भवितव्य प्राप्तीसाठी प्रयत्न – ॲड. कालिदास पाठक
नंदुरबार l प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाने सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र  सहकार मंत्रालय स्थापन केले आहे.तळागळातील तथा ग्रामीण भागातील सहकार क्षेत्राला उज्वल भवितव्य असून सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. असे प्रतिपादन सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष  ॲड. कालिदास पाठक यांनी व्यक्त केले.
सहकार भारतीतर्फे 45 व्या स्थापना दिनानिमित्त 11 जानेवारी  नंदुरबार जिल्हा सहकार भारतीतर्फे देसाईपुरा भागातील  दीनदयाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात सुसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी महिला बचत गटाच्या  प्रकोष्ठ  प्रमुख कल्पना जोशी यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी पुढे बोलताना  अडवोकेट कालिदास पाठक म्हणाले की, सहकार भारतीच्या माध्यमातून पतसंस्था, सहकारी बँका, बचत गट, विविध कार्यकारी सोसायटी तसेच गृहनिर्माण सोसायटी  क्षेत्रासाठी कार्य सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यात सहकार भारती सोबत काम करण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांनी  सदस्य  होण्याचे आवाहन पाठक यांनी केले.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सहकार भारतीचे जिल्हा संघटनमंत्री महादू हिरणवाळे यांनीी सांगितले की, स्व. लक्ष्मणराव इनामदार यांनी  11 जानेवारी 1978 रोजी सहकार भारतीची स्थापना केली.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी संलग्न असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून देशात मोठ्या प्रमाणावर सहकार चळवळ उभी राहिली आहे. सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे हिरणवाळे म्हणाले.
 प्रारंभी सहकार गीत सादर करण्यात आले. यावेळी नंदुरबार जिल्हा सहकार भारतीतर्फे पतसंस्था क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचारी व अल्पबचत प्रतिनिधींचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास सहकार भारतीचे बँक प्रकोष्टप्रमुख बाळकृष्ण वाणी, सदस्यु व दीनदयाल पतपेढीचे व्यवस्थापक पांडुरंग माळी, बी. डी. गोसावी, योगेश्वर जळगावकर, रोहिदास सौपुरे, प्रल्हाद भावसार, सुनील साळी, संभाजी पाटील, सुधाकर धामणे, रवींद्रसिंग राठोड, प्रसाद  अर्थेकर, विवेक अर्थेकर,सुदाम खैरनार,कमलेश कासार,  दरबारसिंग सोलंकी, महिला प्रतिनिधी कल्पना जोशी, तेजश्री पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश चव्हाण यांनी केले. आभार बी. डी. गोसावी यांनी मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत ११६५ बदली अधिकारप्राप्त शिक्षकांना केवळ ४२ जागा, अति दुर्गम भागातील शिक्षक बंधू-भगिनींमध्ये प्रचंड असंतोष

Next Post

पंढरपूरातील श्री विठ्ठल मंदिरात सापडले पोतंभर खोटे दागिने, चौकशी करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

Next Post
पंढरपूरातील श्री विठ्ठल मंदिरात सापडले पोतंभर खोटे दागिने, चौकशी करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

पंढरपूरातील श्री विठ्ठल मंदिरात सापडले पोतंभर खोटे दागिने, चौकशी करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add