तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथील वन विभागाने बिबट्याचा शोधासाठी गस्त वाढवली असून शनिवारी नंदुरबार येथील सहायक उपसंरक्षक अधिकाऱ्यांनी भेट दिली होती.
गेल्या गुरुवारी तळोदा शिवारात सिंह सदृश्य प्राणी बरोबरच बिबट्याचा जोडीने एका कपाशीच्या शेतात धूम ठोकली होती.साहजिकच शेतकरी,मजूर वर्गा मध्ये दहशत पसरली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील तेथे गस्त वाढवली असून शनिवारी त्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला होता.यावेळी पी के बागुल उपवनसंरक्षक मेवासी यांचे मार्गदर्शनाखाली मनोज रघुवंशी सहा वनसंवरक्षक ( प्रादेशिक व वन्यजीव ), एन जे रोडे वनक्षेत्रपाल तळोदा, वनपाल वासुदेव माळी वनरक्षक विरसिंग पावरा, गिरधर पावरा भावना जाधव, लक्ष्मी, पावरा ,एस ओ नाईक ,राजा पावरा व वनमजुर यांनी तळोदा बहुरूपा शिवारात परिसर पिंजून काढून परिसरात गस्त केली तसेच शेतकरी बंधू उमाकांत शेंडे,शशीकांत शेंडे, व ग्रामस्थ यांची भेट घेऊन वन्यप्राणी पासून बचावाचे घ्यावयाची काळजीबाबत आवश्यक ते मार्गदर्शन केले तसेच सदर परिसरात 3 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून वन कर्मचारी नियमित गस्त करत असून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान त्या ठिकाणी पिंजरा देखील लावण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.