म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील जयनगर येथील दिवंगत भाऊराव माळी हे सेन्ट्रल बँक आँफ इंडिया शाखा बामखेडा येथील खातेदार होते. त्यांचे काही दिवसापूर्वी अचानक निधन झाल्याने त्यांचे वारस त्यांची पत्नी लताबाई भाऊराव माळी यांना बँकेचे मुख्य शाखाधिकारी श्री. गजेंद्र यांच्या हस्ते सेन्ट्रल बँक ग्राहक सेवा केंद्र जयनगर येथे दोन लाखाचा धनादेश देण्यात आला.
यावेळी ग्राहक सेवा केंद्राचे संचालक अशोक खलाणे यांचे सहकार्य लाभले व प्रमुख पाहुणे म्हणुन समता परिषदेचे माजी जिंल्हा अध्यक्ष अशोक माळी, माजी पं. स. सदस्य भगवान पाटील, कूषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक ईश्वर माळी, सरपंच सुनिल खलाणे, ग्रा.पं.सदस्य महेंद्र शिंप,हेरंब ट्स्ट अध्यक्ष हिरालाल माळी, माजी सरपंच भरत नगराळे,संदीप माळी,प्रगतशील शेतकरी विठोबा माळी,राजाराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिपक गोसावी, किरण पाटील,रामदेव राठोड, राहुल माळी व यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सुत्रसंचालन ग्राहक सेवा केंद्राचे संचालक अशोक मोतिलाल खलाणे यांनी केले व आभार यादवराव विठ्ठल माळी यांनी मानले.