नंदुरबार l प्रतिनिधी
येथील गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्यामंदिर व आदर्श गुजराती विद्यामंदिर येथे शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून तळोदा येथील नायब तहसीलदार निशा नाईक, मुख्या.सौ.सुषमा शाह, प्रा.डॉ.युवराज पाटील,मुख्याध्यापिका सौ.मिनाक्षी भदाणे, मुख्याध्यापक भद्रेश त्रिवेदी परीक्षक प्रा. मिलिंद वडनगरे, प्रा. डॉ. गौरव गुप्ता हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फीत कापून विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.परीक्षक श्री.गुप्ता यांनी उणिवांचा शोध घेत असतांना नाविन्याचा ध्यास मानवास जडतो असे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले, तर उपस्थित मान्यवरांनी प्रदर्शनास शुभेच्छा दिल्या.

यावेळी इयत्ता दुसरी ते चौथीच्या वर्गातून एकूण १२५ उपकरणांद्वारे 160 मुलानी सहभागनोंदविला.त्यात शेती व पर्यावरण,आरोग्य,गणित व भूमिती,विज्ञान व तंत्रज्ञान,लोकसंख्या शिक्षण व जनजागृती,अंधश्रद्धा निर्मूलन,अवकाश व भूगोल या विषयांवर आधारित उपकरनांचा समावेश होता .

परीक्षक म्हणून प्रा.वडनगरे व श्री. गुप्ता यांनी काम पाहिले.यावेळी संगीत शिक्षिका भाविषा खेडकर व बालचमूने कृतीयुक्त विज्ञान गीत सादर केले. विज्ञान प्रदर्शनातून प्रथम,द्वितीय,तृतीय व उत्तेजनार्थ असे उपकरणाची निवड करण्यात आली.
याप्रसंगी शालेय विज्ञान प्रमुख फकिरा माळी यांनी सूत्रसंचालन केले.मिनाक्षी भदाणे यांनी प्रास्तविक केले.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रदर्शन यशस्वीतेसाठी सहकार्य केले.








