शहादा l प्रतिनिधी
परिवर्धा माध्यमिक विद्यालय येथे आयोजित बीटस्तरीय शहादा नं १ क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. एकुण ८३६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकास, सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी बौद्धिक, शारीरिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.या स्पर्धेत जि. प. मराठी शाळा काथर्दे खुर्द येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. सांघिक खेळात संपुर्ण बीटमधुन ३ री, ४ थी या गटात कबड्डीत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
तसेच वैयक्तिक स्पर्धा रोशन विठ्ठल कोळी – वाचा व गणित सोडवा गट ३ री,४ थी- प्रथम क्रमांक स्मित सुरेश निकुंबे -इंग्रजी चित्र वाचन गट ४ थी -प्रथम वैष्णवी विष्णु ठाकरे -धावणे ३ री,४ थी- प्रथम विवेक विष्णु ठाकरे -धावणे १ ली, २ री -प्रथम रनवीरसिंग रविंद्र गिरासे -इंग्रजी चित्र वाचन गट १ ली, २ री -प्रथम रुद्र हितेष पटले -गणित कोडे -१ ली,२ री प्रथम अनुज दादाभाई बागले – वाचन १ ली,२ री प्रथम मोहिनी बापु सोनवणे -अनुलेखन १ ली,२ री द्वितीय क्रमांक काजल विनोद कोळी -अनुलेखन ३ री, ४ थी -तृतीय वरील सांघिक (कबड्डी) १ ढाल तसेच ९ वैयक्तिक पदके मुलांनी मिळवले,
याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा संगीता जगन पाडवी व सर्व सदस्य, पंचायत समिती सदस्य सुदाम पाटील, पोलिस पाटिल ईश्वर वळवी, सरपंच खंडु ठाकरे, उपसरपंच सावित्री गणेश भील, शिक्षणप्रेमी कृष्णा पवार, गणेश भील तसेच सर्व पालक आणि ग्रामस्थांनी शाळेचे स्पर्धेच्या तयारीसाठी परिश्रम घेतलेल्या मुख्याध्यापक नरेंद्र कुवर, उपशिक्षक श्रीकांत वसईकर, प्रहार शिक्षक संघटना तालुका अध्यक्ष तुकाराम अलट, खेमा वसावे या सर्व शिक्षक, विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.








