नवापूर l प्रतिनिधी
नवापुर शहरातील द्वारकेश्वर महादेव मंदिर परिसरात श्री.महादेव (छोटा बाबा) गणपती मंडळातर्फे दरवर्षी श्रींची विधिवत प्रतिष्ठापना होत असते.मंडळातील पदाधिकारी दरवर्षी शहरातील राजकीय,सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांना श्री गणरायांच्या सांज आरतीसाठी आमंत्रित करत असतात.
ह्या वर्षी बाप्पांचा आगमनाच्या दुसऱ्या दिवशी श्रींची आरती करण्याचा बहुमान भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावित,युवानेते धनंजय भरत गावित व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले जगदीश जयस्वाल व त्यांच्या सौभाग्यवती यांना मिळाला.मान्यवरांचा हस्ते बाप्पांची विधिवत पूजा-अर्चना करून श्रींची आरती करण्यात आली.