म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील ग्रुप ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक ही गेल्या महिन्यात शांततेत पार पडली.यात लोकशाही व ग्रामविकास पॅनल यांच्यात सरळ लढत होती.यात डॉ.भगवान पाटील यांचे ग्रामविकास पॅनलचे लोकनियुक्त सरपंचसह सहा सदस्य निवडून आले तर अंबालाल पाटील यांचे लोकशाही पॅनल चे अकरा सदस्य निवडुन आले होते.

काल दि.९ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता उपसरपंच ची निवडणूक ग्रामपंचायत म्हसावद येथील लोकनियुक्त सरपंच युवराज उत्तम ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.त्यात गुप्त मतदान पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली.मतदान अंती श्रीमती सविता आंबालाल पाटील यांना ११ व प्रकाश खुशाल पाटील यांना ७ मते मिळाली.उपसरपंचपदी लोकशाही पॅनल च्या नवनिर्वाचित सदस्य सविता अंबालाल पाटील यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली.ही निवडणूक पार करण्यासाठी शहादा पंचायत समितीचे उपअभियंता पी.बी.पावरा,ग्राम विकास अधिकारी बी.पी.गिरासे व तलाठी लक्ष्मण कोळी यांनी काम पाहिले.

यावेळी डॉ. भगवान पाटील यांचे ग्रामविकास पॅनलचे लोकनियुक्त सदस्य बिंदा रिवन ठाकरे, प्रकाश खुशाल पाटील,अशोक भगवान धनगर,रंजना सावन पवार,पमाबाई तारसिंग सुकळे, अक्काबाई रमेश ठाकरे तर अंबालाल पाटील यांचे लोकशाही पॅनल चे उषाबाई मंगू पवार, सिंधुबाई रतीलाल शेमळे,छाया रजनीकांत सूर्यवंशी, चिंतामण उत्तम धनगर, विमलबाई वसंत मोरे,भीमसिंग प्रतापसिग सुकळे, गायत्री विजय अहिरे,स्नेहा सचिन बेडमुथा, मगन शंकर भिल,सचिन किशोर बेडमुथा,शांतीबाई मोत्या भिल हे हजर होते.सर्व नवनिर्वाचित उपसरपंच व सदस्य यांचे पुष्पहार टाकून सत्कार व अभिनंदन करण्यात आले.यावेळी शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी उपसरपंच व सर्व सदस्याचे अभिनंदन केले,

यावेळी गणेश नरोत्तम,विठ्ठल हिरजी,दिलीप धनगर,शशिकांत पाटील अंबालाल धनगर,किशोर बेडमुथा,माधव पाटील,मधुकर पाटील,अनिल सूर्यवंशी मोहन अहिरे,सत्तारसिंग ठाकरे,भटू धनगर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के.एन.बडगुजर,पोलीस हवालदार भीमसिंग ठाकरे व पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता.








