Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे श्री दंडपाणेश्‍वर मंदिरात चोरट्यांचा डल्ला,सव्वा किलो चांदीचे दागिने लंपास, तीन दान पेटया फोडल्या

team by team
January 9, 2023
in क्राईम
0
नंदुरबार येथे श्री दंडपाणेश्‍वर मंदिरात चोरट्यांचा डल्ला,सव्वा किलो चांदीचे दागिने लंपास, तीन दान पेटया फोडल्या

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील प्रसिध्द देवस्थान असलेल्या श्री दंडपाणेश्‍वर मंदिरातील गणेश मर्तीवरील ३० हजाराचे चांदीचे आभुषणे तसेच तीन दानपेट्या फोडुन त्यातील १२ हजार रूपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ अडाली आहे.दरम्यान पुखराज मोडमल जैन यांच्या फार्महाऊस मधील जैन मंदिरामधील दान पेटीतील १० हजार रूपये ही चोरट्यांनी लंपास केले असुन याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान चोरट्यांनी श्री.दंडपाणेश्‍वर मंदिरातील सिसिटिव्हीचा डीव्हीआर ही लंपास केल्याचे सांगीतले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नंदुरबार शहरातील प्रसिध्द देवस्थान म्हणुन श्री दंडपाणेश्‍वर मंदिर प्रसिध्द आहे. दि.८ जानेवारी रात्री १० ते ९ जानेवारी पहाटे ४.४१ वाजेदरम्यान अज्ञात चोरटयांनी श्री दंडपाणेश्‍वर मंदिरातील मुख्य गाभार्‍याच्या दरवाजाचे कुलूपाचा कडीचा कोयंडा तोडूत आत प्रवेश केला. मंदिरात असलेल्या गणेश मुर्तीचे दोन चांदीचे दात, चांदीची गणपतीची सोंडवरील नक्षदार कवच चांदीची छत्री दोन कानावरील कवच, दोन चांदीचे जास्वंदीचे फुल, चांदीचा मुकूट दोन चांदीचे गळयातील हार, एक चांदीचा ओम, त्रिशुल असा सुमारे १ ते सव्वा किलो वजनाचा असा एकूण ३० हजार तसेच तीन दानपेटया फोडून १२ हजार रूपये रोख रक्कम लंपास केली.

दरम्यान श्री दंडपाणेश्‍वर मंदिरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र चोरटयांनी मंदिरात परिसरात प्रवेश करताच आदी डीव्हीआर फोडला त्यानंतर दानपेटी तोडून रक्कम लंपास केली.

दरम्यान सीसीटिव्हीचे डिव्हीआरही लंपास केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर या चोरटयांनी आपला मोर्चा पुखराज जैन यांच्या फार्महाऊसकडे वळविला तेथे जैन मंदिरात असलेल्या दानपेटीतून १० हजार रूपये रोख लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरीची घटना कळताच पोलीस उपअधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेशषन शाखेचे किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी याठिकाणी पाहणी केली.

जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके रवाना करण्यात आली. याप्रकरणी चंद्रकांत प्रल्हाद चौधरी रा.जळकाबाजार (नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर करीत आहेत. दरम्यान मंगळी चतुर्थीच्या आदला दिवशीच प्रसिध्द असलेल्या श्री दंडपाणेश्‍वर मंदिरात चोरी झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कोराई येथे दोन गटात हाणामारी पाच जण जखमी, परस्पर विरोधी फिर्यादी, २५ जणांविरूध्द गुन्हा

Next Post

खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते उद्घाटन भुसावळ-मुंबई नवीन रेल्वे उद्यापासुन

Next Post
खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते उद्घाटन भुसावळ-मुंबई नवीन रेल्वे उद्यापासुन

खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते उद्घाटन भुसावळ-मुंबई नवीन रेल्वे उद्यापासुन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add