नंदुरबार| प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील कोराई येथे लग्नकार्य समाजकार्य आदी कार्यक्रमांना येत नाही. या करणावरून दोन गटात हाणामारी झाली असून या मारहाणीत पाच जणांना दुखापत झाली आहे. परस्पर विरोधी फिर्यादीतुन२५ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्राणी तालुक्यातील कोराई येथे श्रावण पारत्या वसावे बसले असतांना नरेश वसावे हा त्यांच्याजवळ येवून सांगू लागला की, तुम्ही असे सांगतात की, गावात व समाजात कोणतेही उत्तरकार्य लग्न समारंभ इतर कार्यक्रमाला येत नाही. असे सांगून शिवीगाळ केली. याचा राग आल्याने यामुळे नरेश वसावे याने गैरकायद्याची मंडळी जमवून श्रावण वसावे व इतरांना लागडी दांडक्याने हातातील कुर्हाडीनरे मारहाण केली तसेच मारहाण करण्याची धमकी देत शिवीगाळ करीत ते निघून गेले. या मारहाणीत श्रावण वसावे, केतन श्रावण वसावे, पवन पारत्या वसावे सर्व रा.कोराई (ता.अक्कलकुवा) यांना दुखापत झाली.
या प्रकरणी श्रावण पारत्या वसावे यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात बबुल विनोद वसावे, योगेश दिगंबर वसावे, वैभव नरेश वसावे, मनेश विनोद वसावे, नरेश दिगंबर वसावे, विनोद दिगंबर वसावे, उमेश दिगंबर वसावे, ललिताबाई राजेश वसावे, संगिताबाई विनोद वसावे सर्व रा.कोराई (ता.अक्कलकुवा) यांच्याविरूध्द भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई जितेंद्र महाजन करीत आहे.
तर दुसर्या फिर्यादीत म्हटले आहे की, श्रावण वसावे व त्याच्याजवळ इतर लोक शेकोटीजवळ बसले असतांना त्याठिकाणी नरेश वसावे गेले व त्यांनी त्यांना विचारले की, तुम्ही आमच्या परिवार समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमाला येत नाही. असे सांगतात. जर तुम्हा आमच्याबद्दल काही समाजात वाईत वाटत असेल तो गाव पंच बसवून वाद मिटवून टाकू, काही वाद असतील तर थांबवा, असे सांगितल्याचा राग आल्याने श्रावण वसावे याने गैरकायद्याची मंडळी जमवून नरेश वसावे व इतरांना मारहाण केली तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली.या मारहाणीत नरेश दिगंबर वसावे, ललिताबाई दिगंबर वसावे दोन्ही रा.कोराई (ता.अक्कलकुवा) यांना दुखापत झाली.
याप्रकरणी नरेश दिगंबर वसावे यांच्या फिर्यादीवरून अक्राणी पोलीस ठाण्यात श्रावण पारत्या वसावे, केतन श्रावण वसावे, भावसिंग रामसिंग वसावे, अनिल गेबु वसावे, पवन पारत्या वसावे, राजुसिंग वसावे, संदिप भिमसिंग वसावे, किसन जात्रु वसावे, अनिकेत ईश्वर नाईक, प्रियंका सुधाकर वसावे, सतिवा पारत्या वसावे, योगीता रामसिंग वसावे, गिता रामसिंग वसावे, अमृता भावसिंग वसावे, सुनिता श्रावण वसावे सर्व रा.कोराई (ता.अक्कलकुवा) यांच्याविरूध्द अक्कलकुवा पोलीस ठाण्यात भादंवि कलम १४३,१४७, १४९,३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार उल्हास ठिगळे करीत आहेत.