नंदुरबार | प्रतिनिधी
कर्जाची रक्कम परतफेड न करात बँकेत तारण असलेली मालमत्ता संगणमत करून परस्पर विकून पी.के.अणा जनता सहकारी बँकेची ३ कोटी ५० लाखात फसवणूक केल्या प्रकरणी ६ जणांविरूध्द नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार.सन १९९४-९५ ते सन २००४ दरम्यान पी.के.अण्णा जनता सहकारी बँकेतून कर्ज घेवून मालमत्ता तारण ठेवण्यात आले. कर्ज देवून मालमत्ता कर्जपोटी तारण न घेता अपूर्ण मालमत्ता कर्ज रक्कमेपाटी स्विकारून सदर मालमत्तेच्या सातबार्यावर बोजा न चढविता वाटप केलेले कर्ज वेळेत फेड होणार नाही.
याची जाणीव असतांना तत्कालीन संचालक मंडळाने बेकायदेशीरपणे व नियमाबाह्य पध्दतीने कर्ज मंजूर केले तसेच बँकेतील ठेविदारांचा पैसा हडप करण्याच्या उद्देशाने एकाच कुटूंबातील सदस्यांना बेकायदेशीर कर्ज मंजूर करून बँकेकडे तारण असलेली मालमत्ता आपसात संगनमत करून पी.के.अण्णा जनता सहकारी बँकेची साडेतीन कोटीत फसवणूक करण्यात आली. म्हणून सहायक निबंधक मनोजर मधुकर चौधरी यांच्या फिर्यादीवरून राजाराम दुल्लभ पाटील रा.वृंदावन नगर (शहादा), रमेश श्रीपत पाटील रा.पुरूषोत्तमनगर (शहादा), दामोदर हरी पाटील (खेतीया रोड,शहादा), पांडूरंग रामदास पाटील (रा.पुरूषोत्तनगर शहादा), सुभाष तुकाराम पाटील, कैलास सखाराम पाटील दोन्ही रा.गोगापूर (ता.शहादा) यांच्याविरूध्द नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४०६, ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे करीत आहेत.