अक्कलकुवा -प्रतिनिधि
अक्कलकुवा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे सावित्रीबाई फूले माध्यमिक विद्यालयात समारोप करण्यात आला.प्राथमिक गटात दिव्यमनी माध्यमिक विद्यालय खापर येथील गरिमा पटेल तर माध्यमिक गटात वेली माता आश्रम वेली येथील ओल्या दाम्या तडवी या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. प्राथमिक गटातून २६ व माध्यमिक गटातून १५ शिक्षक गटातून २ असे ऐकून ४३ उपकरणांनी सहभाग नोंदविला होता. या समारोप प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाटील उपस्थित होते.प्रमुख अतिथी म्हणुन संस्थेचे संचालक संदीप पाटील, नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे, गटशिक्षण अधिकारी मंगेश निकुंभ, वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. पी. सावंत, तालुका मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्रमोद कोळी व सचिव डीबी वाघ उपस्थित होते.
परीक्षक म्हणून एम.बी.चव्हाण, सी.आर.पाटील, आर.बी.माळी यांनी काम पाहिले.याप्रसंगी पत्रकार संघाचे सुधीर ब्राह्मणे यांची उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतन कलाल व आभार प्रदर्शन विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या पटेल यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक शिक्षण कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
निकाल:-प्राथमिक गटात-
प्रथम गरिमा पटेल (दिव्यमनी माध्यमिक विद्यालय खापर), द्वितीय राहुल संतोष पेंढारकर (सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय सोरापाडा) तृतीय अफसा नईमखान पठान (उर्दू माध्यमिक विद्यालय खापर) आदिवासी राखीव दिपांगी स्वरूपसिंग वसावे (कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय कोराई)
माध्यमिक गटात:-
प्रथम ओल्या दाम्या तडवी( वेली माता आश्रम वेली), द्वितीय शाकिब शेख (अली अलाना इंग्लिश स्कूल अक्कलकुवा), तृतीय दिव्यांनी महेंद्र वसावे (भातीजी महाराज माध्यमिक विद्यालय काकड़खूंट)
शिक्षक प्राथमिक- अल्का अशोक पाटील ( जि.प.मराठी शाळा मोगरा)शिक्षक माध्यमिक- चेतन रमेश पाटील(सातपुडा वैभव विद्यालय वाण्याविहीर)
प्रथम ओल्या दाम्या तडवी( वेली माता आश्रम वेली), द्वितीय शाकिब शेख (अली अलाना इंग्लिश स्कूल अक्कलकुवा), तृतीय दिव्यांनी महेंद्र वसावे (भातीजी महाराज माध्यमिक विद्यालय काकड़खूंट)
शिक्षक प्राथमिक- अल्का अशोक पाटील ( जि.प.मराठी शाळा मोगरा)शिक्षक माध्यमिक- चेतन रमेश पाटील(सातपुडा वैभव विद्यालय वाण्याविहीर)