नंदुरबार | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील घोडजामन रस्त्यावर आयशरमधून इंजायली जळावू लाकूड भरून वाहतुक केली जात असल्याने नवापूर वनविभागाच्या पथकाने इंजायली लाकूडसाठा जप्त केला आहे. यावेळी आयशर सोडुन चालक अंधाराचा फायदा घेत पसार झाला. वनविभागाने वाहनासह सुमारे साडेचार लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नवापूर तालुक्यातील नवापूर ते घोडजामने रस्त्याने जाणार्या आयशरला गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या पथक पाहताच चालक आयशर सोडून अंधाराचा फायदा घेत चालक पसयार झाला. पथकाने आयशर (क्र.एम.एच.१८-एम.९५२३) तपासणी केली असता इंजायली जळावू लाकूडसाठा मिळून आला वाहनात लाकूडसाठा असा एकुण साडेचार लाख रूपये किंमतीचा मुद्दमाल जप्त करून नवापूर विक्री आगारात जमा करण्यात आला.
ही कारवाई धुळेचे वनसंरक्षक हाऊसिंग, नंदुरबारचे उपवनसंरक्षक कृष्णा भवर, धुळे विभागीय वनअधिकारी दक्षता पथकाचे संजय पाटील, नंदुरबारचे सहायक वनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमल, वनरक्षक विकास शिंदे, कमलेश वसावे, वाहन चालक दिलीप गुरव यांच्या पथकाने केली.