नवापूर | प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग सहावरील कोंडाईबारी घाटाच्या खाली खांबचौदर गावाच्या शिवारात चालकाला डुलकी लागल्याने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघाता चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात सहचालक गंभीर जखमी झाला आहे.
नवापुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गसहा वरील कोंडाईबारी घाटाच्या खाली खांबचौदर गावाच्या शिवारात पहाटे चार वाजेच्या दरम्यान ओरंगाबाद हुन अद्रक भरून गुजरात राज्यातील सुरत येथे जाणारा आयसर टेम्पो ( क्र. एम.एच.२० ई.एल.९०६७) वरिल चालक कोंडाईबारी घाट येथुन भरघाव वेगात येत असतात ,खांबचौदर गावाच्या शिवारात डुलकी लागल्याने समोरील अज्ञात वाहना ला जोरदार धडक दिली.
या धडकेत आयसर टेम्पो ची पुर्ण कॅबीन चक्काचूर होवून चालक शेख रियाकत शेख हबीब रा.खुलताबाद जि.ओरंगाबाद हा जागीच ठार झाला.तर सहचालक जबर जखमी झाल्याची घटना घडली यावेळी महामार्ग सुरक्षा पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी पो.उप.नि.अमृत पाटील, हे.कॉ.संजय माळी ,साहेबराव खांडेकर, योगेश सोनवणे, चालक राजु कोकणी यांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या सहाय्याने मयत चालक व जखमी सहचालकाला बाहेर काढले ,सहचालक जबर जखमी असल्याने त्यास उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.








