नंदुरबार | प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील टाकली विहिरीमळ या परिसरामध्ये अद्यापही डांबरीकरणाचे रस्ते झालेले नाही. भारत स्वातंत्र्याला ७५ वर्ष उलटूनही सातपुडा अति दुर्गम भागातील अनेक भागात. वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा उपलब्ध झालेल्या नाही. त्यापैकीच तळोदा तालुक्यातील टाकली ते विहिरी माळ दरम्यान डोंगरदर्यातील कच्चा रस्ता असल्याने. विहिरीमाळहुन तळोदा येथे खरेदी विक्रीसाठी येणार्या पिकअप वाहन मालक मगन गोमा वळवी यांच्या वाहनाला अपघात झाला आहे.
डोंगरातील सागांच्या झाडामुळे सदर वाहन जाऊन ठोकल्याने अडकले. त्यामुळे दरीत कोसळतांना सदर वाहन व नागरिक बचावले आहे. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. तर वाहनातील प्रवाशांना किरकोळ मुका मार लागला आहे. शहादा तळोदा विधानसभेचे आ. राजेश पाडवी यांनी हिवाळी अधिवेशनात. दुर्गम भागातील रस्त्यांच्या अवस्थेबाबत प्रश्न विचारून ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर ज्या ठिकाणी अद्यापही रस्ते झालेले नाही. त्या ठिकाणी रस्ते तयार करावे अशी मागणी केली होती. आ.राजेश पाडवी यांच्या मागणीला मान देऊन आता तरी प्रशासन जागे होईल का. हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या नावावर अनेक रस्ते तयार होत आहेत. त्यापैकी दुर्गम भागात अनेक रस्ते भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्ते तयार करून नागरिकांना सुविधा द्याव्यात हीच अपेक्षा नागरिकांनी केली आहे.








