Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन

समाजाने पत्रकारांची कदर करण्याची अपेक्षा स्पृहनिह बाब; सूर्यभान राजपूत

team by team
January 7, 2023
in राज्य
0
जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन
नंदुरबार l प्रतिनिधी
पत्रकारांनी पत्रकारिता करीत असतांना आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. ३६५ दिवस समाजासाठी काम करतांना ६ जानेवारी ‘पत्रकार दिवस’ हा दसरा म्हणून साजरा केला जातो.जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी पत्रकारांसाठी नेहमी झटत असतात.पत्रकारांनी आत्ममंथन करायला पाहिजे की, समाजाप्रती आपण किती उतराई झालो आहोत. याचे भान ठेवत समाजाने पत्रकारांची कदर करावी ही अपेक्षा निश्चितच स्पृहणीय आहे. असे प्रतिपादन ऑल इंडिया न्यूज पेपर असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यभान राजपूत यांनी केले.
नंदुरबार शहरातील नेहरूनगर परिसरातील पत्रकार भवनामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी राजपूत बोलत कार्यक्रमाच्या मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हिरालाल चौधरी यांनी केले. व्यासपीठावर पत्रकार मनोज शेलार, उद्योजक नितेश अग्रवाल,विशाल माळी, भिकेश पाटील,बाबासाहेब राजपूत,रमेश महाजन,जगदीश सोनवणे,देवेंद्र बोरसे,अविनाश भामरे,धर्मेंद्र पाटील,सतीश गोसावी,राजू पाटील उपस्थित होते.
प्रसंगी गौतम बैसाने,किसन जाधव,सुनील कुलकर्णी,गजेंद्रसिंग राजपूत,दिलीप बडगुजर,जगदीश ठाकूर,जितेंद्र जाधव,ज्ञानेश्वर माळी,दिनू गावित,ज्ञानेश्वर गवले,दीपक सोनार,किशोर गवळी,आसिफ मिर्झा,उमेश पांढारकर,प्रशांत जव्हेरी,जीवन माळी,नितीन पाटील,सूर्यकांत खैरनार, सुनिल कुलकर्णी, निलेश चौधरी,महादू  हिरणवाळे,कल्पेश मोरे,शैलेश चौधरी,महेंद्र चौधरी,महेंद्र चित्ते,वीरेंद्र राजपूत, किसन जाधव, सुबोध अहिरे, प्रेमचंद राजपूत, चिराउद्दीन शाह आदी उपस्थित होते.
आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट कार्ड वितरण
राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट कार्डचे  वितरण वितरण करण्यात आले. हेल्थ कार्ड हे डिजिटल स्वरूपाचे असून, ज्यामध्ये सर्व वैद्यकीय अहवाल संकलित करता येऊ शकतो.रुग्ण आजारी पडल्यास निदान कोणत्या डॉक्टरांकडे झाले, कोणत्या तपासण्या करायच्या आदी सर्व प्रकारची माहिती या कार्डमधे असणार आहे. कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांना कार्डचे वितरण करण्यात आले.
पत्रकार भवनाच्या सुशोभीकरणासाठी देणगी
नेहरू नगरातील पत्रकार भवनाच्या सुशोभीकरणासाठी उद्योजक नितेश अग्रवाल यांनी १ लाख ११ हजार रुपयांची देणगी कार्यक्रमाप्रसंगी जाहीर केली. त्यांच्या सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
उत्कृष्ट कार्याच्या गौरव
पत्रकार दिनाच्या औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व पुरस्कार प्राप्त रणजित राजपूत,मनोज शेलार,भिकेश पाटील व राजेंद्र पवार यांच्या शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.आभार प्रदर्शन रमेश महाजन तर सूत्रसंचलन रणजित राजपूत यांनी केले.
नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार परिषद समन्वयक पदी पत्रकार विशाल माळी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी नियुक्तीपत्र प्रदान करतांना ज्येष्ठ पत्रकार सुर्यभान राजपूत सोबत पत्रकार मनोज शेलार, संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी, युवा उद्योजक नितेश अग्रवाल, बाबा राजपूत, रमेश महाजन, अविनाश भामरे, भिकेश पाटील, धर्मेंद्र पाटील, देवेंद्र बोरसे, सतिश गोसावी, राजू पाटील, जगदिश सोनवणे आदी. 
बातमी शेअर करा
Previous Post

मागील वर्षभरात ऑनलाईन फसवणूक झालेले साडे तेरा लाख परत मिळवून देण्यात नंदुरबार सायबर सेलला यश

Next Post

व्हॉईस ऑफ मीडियातर्फे विमा पॉलिसीचे वितरण 

Next Post
व्हॉईस ऑफ मीडियातर्फे विमा पॉलिसीचे वितरण 

व्हॉईस ऑफ मीडियातर्फे विमा पॉलिसीचे वितरण 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add