नंदुरबार l प्रतिनिधी
पत्रकारांनी पत्रकारिता करीत असतांना आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. ३६५ दिवस समाजासाठी काम करतांना ६ जानेवारी ‘पत्रकार दिवस’ हा दसरा म्हणून साजरा केला जातो.जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी पत्रकारांसाठी नेहमी झटत असतात.पत्रकारांनी आत्ममंथन करायला पाहिजे की, समाजाप्रती आपण किती उतराई झालो आहोत. याचे भान ठेवत समाजाने पत्रकारांची कदर करावी ही अपेक्षा निश्चितच स्पृहणीय आहे. असे प्रतिपादन ऑल इंडिया न्यूज पेपर असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यभान राजपूत यांनी केले.

नंदुरबार शहरातील नेहरूनगर परिसरातील पत्रकार भवनामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी राजपूत बोलत कार्यक्रमाच्या मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हिरालाल चौधरी यांनी केले. व्यासपीठावर पत्रकार मनोज शेलार, उद्योजक नितेश अग्रवाल,विशाल माळी, भिकेश पाटील,बाबासाहेब राजपूत,रमेश महाजन,जगदीश सोनवणे,देवेंद्र बोरसे,अविनाश भामरे,धर्मेंद्र पाटील,सतीश गोसावी,राजू पाटील उपस्थित होते.

प्रसंगी गौतम बैसाने,किसन जाधव,सुनील कुलकर्णी,गजेंद्रसिंग राजपूत,दिलीप बडगुजर,जगदीश ठाकूर,जितेंद्र जाधव,ज्ञानेश्वर माळी,दिनू गावित,ज्ञानेश्वर गवले,दीपक सोनार,किशोर गवळी,आसिफ मिर्झा,उमेश पांढारकर,प्रशांत जव्हेरी,जीवन माळी,नितीन पाटील,सूर्यकांत खैरनार, सुनिल कुलकर्णी, निलेश चौधरी,महादू हिरणवाळे,कल्पेश मोरे,शैलेश चौधरी,महेंद्र चौधरी,महेंद्र चित्ते,वीरेंद्र राजपूत, किसन जाधव, सुबोध अहिरे, प्रेमचंद राजपूत, चिराउद्दीन शाह आदी उपस्थित होते.
आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट कार्ड वितरण
राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट कार्डचे वितरण वितरण करण्यात आले. हेल्थ कार्ड हे डिजिटल स्वरूपाचे असून, ज्यामध्ये सर्व वैद्यकीय अहवाल संकलित करता येऊ शकतो.रुग्ण आजारी पडल्यास निदान कोणत्या डॉक्टरांकडे झाले, कोणत्या तपासण्या करायच्या आदी सर्व प्रकारची माहिती या कार्डमधे असणार आहे. कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांना कार्डचे वितरण करण्यात आले.
पत्रकार भवनाच्या सुशोभीकरणासाठी देणगी
नेहरू नगरातील पत्रकार भवनाच्या सुशोभीकरणासाठी उद्योजक नितेश अग्रवाल यांनी १ लाख ११ हजार रुपयांची देणगी कार्यक्रमाप्रसंगी जाहीर केली. त्यांच्या सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
उत्कृष्ट कार्याच्या गौरव
पत्रकार दिनाच्या औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व पुरस्कार प्राप्त रणजित राजपूत,मनोज शेलार,भिकेश पाटील व राजेंद्र पवार यांच्या शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.आभार प्रदर्शन रमेश महाजन तर सूत्रसंचलन रणजित राजपूत यांनी केले.

नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार परिषद समन्वयक पदी पत्रकार विशाल माळी यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी नियुक्तीपत्र प्रदान करतांना ज्येष्ठ पत्रकार सुर्यभान राजपूत सोबत पत्रकार मनोज शेलार, संघाचे अध्यक्ष हिरालाल चौधरी, युवा उद्योजक नितेश अग्रवाल, बाबा राजपूत, रमेश महाजन, अविनाश भामरे, भिकेश पाटील, धर्मेंद्र पाटील, देवेंद्र बोरसे, सतिश गोसावी, राजू पाटील, जगदिश सोनवणे आदी.








