नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार सायबर सेलची धडाकेबाज कामगिरी करीत मागील वर्षभरात ऑनलाईन फसवणूक झालेले 13 लाख 46 हजार 648 रुपये परत मिळवून देण्यात यश आले आहे.
आजच्या आधुनिक युगात मोबाईल ही काळाची गरज बनलेली असून बरेच आर्थिक व्यवहार हे मोबाईलद्वारे किंवा ऑनलाईन पध्दतीने केले जातात, त्यामुळे वेळेची बचत होवून वाचलेला वेळ हा चांगल्या कामासाठी वापरु शकतो, परंतु तोच मोबाईल काही वेळेस नागरिकांच्या अडचणी वाढविण्याचे कारण ठरु शकतो.
दि. 5 जानेवारी 2022 रोजी ऑनलाईन सायबर पोर्टलवरील नंदुरबार शहरातील तक्रारदार दिपक शिंदे यांना 5 जानेवारी 2022 रोजी त्यांचे गॅस एजन्सीचे कार्यालयात असतांना त्यांचे SBI Yono ऍप्लीकेशन चालु होत नसल्यामुळे त्यांनी गुगल वर जावुन SBI कस्टमर केअरचा नंबर शोधला त्या नंबरवर तक्रारदार यांनी संपर्क केला असता त्यांनी तक्रारदार यांना Any Desk नावाचे ऍप्लीकेशन इंन्स्टॉल करण्यास सांगुण तक्रारदार यांच्या मोबाईलचा ताबा घेतला. व तक्रारदार यांच्या खात्यातून 4 लाख 20 हजार रुपये ऑनलाईन कपात करुन त्यांची फसवणुक केली.
बाबतचा प्रकार तक्रारदार यांना समजताच त्यांनी तात्काळ सायबर सेल, नंदुरबार येथे संपर्क करुन सायबर सेल, नंदुरबार येथे समक्ष येवुन त्यांची झालेल्या फसवणुक बाबत हजर असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना माहीती सांगुन ऑनलाईन सायबर पोर्टलवर तक्रार दाखल केली. सायबर सेल, नंदुरबार येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तात्काळ तक्रारीवर कारवाई करत संबंधीत वॉलेट/बँकेशी समन्वय साधुन व वेळावेळी पाठपुरावा करुन फसवणुक झालेली रक्कम गोठवून ती परत तक्रारदार यांच्या खात्यात परत मागविण्याची ईमेलद्वारे कारवाई केली.
त्यामुळे तक्रारदार यांची एकुण 4 लाख २० हजार रुपयाच्या रकमेपैकी 1 लाख 50 हजार रुपयाची रक्कम तात्काळ वाचविण्यात यश आले. व रुपये 1 लाख 50 हजार लाभधारी खातेधारकाच्या बँक खात्यात गोठवून सदरची रक्कम ही न्यायालयाच्या आदेशानुसार परत मिळणार आहे. म्हणुन तक्रारदार यांचे एकुण तीन लाख रुपये वाचविण्यात सायबर सेल येथील पथकाला यश आले आहे.
18 ऑक्टोंबर 2022 रोजी ऑनलाईन सायबर पोर्टल वरील नवापुर येथील तक्रारदार विकास शहा यांना घरी असतांना अज्ञात इसमाचा फोन आला व त्या इसमाने तक्रारदार यांना सांगीतले की, तुमचे लाईट बिल 11 रुपयांनी कमी भरलेले आहे. म्हणुन ते भरण्यासाठी आम्ही तुमच्या मोबाईलवर पाठविलेली लिंक ओपन करा. असे सांगीतल्याने तक्रारदार यांनी सदरची लिंक त्यांचे मोबाईल मध्ये ओपन केली असता त्यांच्या खात्यातून अचानक 2 लाख 98 हजार रुपये ऑनलाईन कपात झाले. बाबत त्यांना एसएमएस द्वारे समजले असता त्यांना समजले की त्यांची फसवणुक झाली आहे. म्हणुन त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ सायबर सेल नंदुरबार येथे संपर्क साधुन झालेल्या फसवणुक बाबत सांगुन ऑनलाईन सायबर पोर्टलवर तक्रार दाखल केली.
सायबर सेल, नंदुरबार येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कर्तव्यात तत्परता दाखवत संबंधीत वॉलेट / बँकेशी तात्काळ समन्वय साधुन व वेळावेळी पाठपुरावा करुन फसवणुक झालेली रक्कम गोठवून ती परत तक्रारदार यांच्या खात्यात परत मागविण्याची ईमेलद्वारे कारवाई केली. त्यामुळे तक्रारदार यांची एकुण 2 लाख 98 हजार रुपयाची रक्कम वाचविण्यात यश आले. व 29 ऑक्टोंबर रोजी तक्रारदार यांच्या खात्यातून गेलेले 2 लाख 98 हजार रुपये त्यांच्या खात्यात पुन्हा परत मिळवुन दिले.
सन 2022 मध्ये सायबर पोलीस ठाणे नंदुरबार येथेनंदुरबार जिल्ह्यातील विविध प्रकारच्या फसवणुक झालेल्या 36 पेक्षा अधिक लोकांनी तात्काळ सायबर पोर्टल www.cybercrime.gov.in वर ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. त्यावर सायबर पोलीस ठाणे नंदुरबार येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय तत्परतेने संबंधीत मोबाईल वॉलेट, बँक यांचे संबंधीत नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधुन व वेळोवेळी पाठपुरावा करुन तक्रारदार यांचे फसवणुक झालेले एकुण 13 लाख 46 हजार 648 रुपये परत मिळवुन दिले. त्यामुळे त्या सर्व तक्रारदारांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचेसह सायबर सेलचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर व पथकाचे अभिनंदन करुन समाधान व्यक्त केले आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील व अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस हवालदार दिपक चित्ते व पोलीस नाईक पंकज महाले, कन्हैया पाटील, चंद्रशेखर बडगुजर, हितेश पाटील, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली आहे..
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत की, एखाद्या व्यक्तीला सायबर चोरट्यांनी फसवुन त्यांचे खात्यातून पैसे काढुन घेतल्यास तात्काळ पोलीसांकडे तक्रार करावी. तसेच तात्काळ सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते.
तसेच कोणतेही अनोळखी ॲप डाऊनलोड करु नये, अज्ञात नंबरवरुन पाठविलेली संशयीत लिंक उघडु नये. मोबाईलवर आलेला बँकेचा OTP किंवा बँक अकाउंट संदर्भात कोणतीही माहीती शेअर करु नये. व Instant लोन देणारे ऍप्लीकेशन इंन्स्टॉल करु नये. इंन्स्टॉल केल्यास आपले संपर्क यादी व फोटो गॅलरीचा ताबा मिळवुन आपला मानसिक छळ व बदनामी केली जाते.
फेसबुकवर अनोळखी व्यक्तीकडुन (विशेषत: महिलांकडुन) आलेली Friend Request accept करु नये. यामुळे तुमची फसवणुक होवु शकते. त्यामुळे ऑनलाईन फसवणुक झाल्यास नागरीकांनी तात्काळ जवळचे पोलीस ठाणे / ऑनलाईन www.cybercrime.gov.in यावर किंवा सायबर सेल नंदुरबार येथे संपर्क साधावा. अधिक सायबर माहीतीसाठी व जनजागृतीसाठी Twitter वर @Cyberdost या अकाउंटला Follow करणे. तसेच t.me/cyberdostic या टेलिग्राम ग्रुपवर जॉईंट व्हावे असे आवाहन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.









