शहादा l प्रतिनिधी
राज्याचे अन्न नागरी पुरवठा व संरक्षण मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाल्याने शहादा येथे समता परिषदेतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला .
महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आल्याने समता परिषदेतर्फे शहादा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात फटाके फोडून व पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला . सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच.एस.सातभाई यांनी एसीबीने महाराष्ट्र सदनप्रकरणी गुन्हा नोंद करताना तांत्रिक बाबींची जाण नसतानाही एसीबीच्या तपास अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे आणि बेकायदेशीरपणे कारवाई केल्याचा ठपका ठेवत छगन भुजबळ आणि खासदार समीर भुजबळ यांना दोषमुक्त केले . अन्य सहा जणांची सुटका करण्यात आली आहे . यामुळे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक आघाडीच्यावतीने शहादा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे फटाके फोडून व पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला . यावेळी शहादा तालुकाध्यक्ष जगदीश माळी यांनी संघटना कायम भुजबळांच्या पाठीशी असून जनसामान्यांचा पाठींबा असल्याचे सांगितले .यावेळी समता परिषदेचे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे , राष्ट्रवादी युवक शहादा तालुकाध्यक्ष महेंद्र कुवर , यादव माळी , योगीराज ईशी , विनोद चव्हाण , राजवीर जगदेव , महेंद्र अहिरे , राजेंद्र कुवर , रोहित कुवर , सनी जगदेव, मंदार सामुद्रे , मयुर शर्मा , उमेश महिरे उपस्थित होते.