Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जवाहर नवोदय विद्यालयातील सहावी प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

team by team
January 6, 2023
in शैक्षणिक
0
जवाहर नवोदय विद्यालयातील सहावी प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नंदुरबार  l
जवाहर नवोदय विद्यालय, श्रावणी नंदुरबार-2 मध्ये 2023-2024 शैक्षणिक वर्षांसाठी इयत्ता सहावीच्या प्रवेश परीक्षेसाठी 31 जानेवारी,2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.एस.पातोडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जवाहर नवोदय विद्यालय,श्रावणी, नंदुरबार- 2 मध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी हा जिल्ह्यातील नवापूर व नंदुरबार तालुक्यातील शासनमान्य शाळेत इयत्ता पाचवीत 2022-2023 या शैक्षणिक वर्षांत शिकत असावा. विद्यार्थ्यांचा जन्म 1 मे 2011 पूर्वी झालेला असावा.30 एप्रिल 2013 नंतर झालेला नसावा. सदर अट सर्वांसाठी लागू असेल. सन 2020-2021, 2021-2022,2022-2023 यावर्षांत विद्यार्थ्यांने तिसरी, चौथी व पाचवीत अनुक्रमे खंड न पाडता उत्तीर्ण असावा. अनुसूचित जाती,जमाती आणि मुली, दिव्यांग संवर्गासाठी व इतर मागासवर्गासाठी जागा राखीव असतील. तृतीयपंथीय उमेदवारसुध्दा या निवड चाचणीसाठी अर्ज करु शकतात. अर्ज सादर करतांना आधार कार्ड, मुख्याध्यापकाचे पत्र, रहिवाशी दाखला, फोटो व सही आवश्यक आहे.
जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेश परीक्षा शनिवार दि.29 एप्रिल,2023 रोजी सकाळी 11.30 वाजता होईल. माहिती पत्रक व प्रवेश अर्जासाठी www.navodaya.gov.in/nvs/en/Home1 तसेच https://cbseitms.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज सादर करावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.एस.पातोडे यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

राज्यातील खाजगी चित्रीकरण स्थळांची माहिती पाठविण्याचे आवाहन

Next Post

लम्पी रोगांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधीत केलेली पशूबाजार व गुरांची वाहतूक पुर्वरत सुरु : जिल्हाधिकारी : मनीषा खत्री

Next Post
नायलॉन मांजाची विक्री व वापरास प्रतिबंध : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे निर्देश

लम्पी रोगांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधीत केलेली पशूबाजार व गुरांची वाहतूक पुर्वरत सुरु : जिल्हाधिकारी : मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add