म्हसावद l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील मांडवा, (देवमोगरा पू ) येथील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथे भारतातील प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचा स्वयंपाकीन सोनीबाई वसावे या होत्या.प्रमुख अतिथी म्हणून अनुदानित आश्रमशाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक एस.व्ही.देसले व प्राथमिक मुख्याध्यापक डी.एन .गोसावी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक एच.आय.गोराने यांनी केले,कार्यक्रमचा प्रारंभी सावित्री बाई यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण, दिप प्रज्वलन करण्यात आले ,शाळेचे विध्यार्थी विद्यार्थिनी यांनी सावित्रीबाई यांचे कार्य व विचार मांडले.
आश्रमशाळेतील कर्मचारी प्रा.एम ए दिघे, प्रा. जे.डी.पाटील,प्रा.आर.बी.आगळे, प्रा.पी.एम. बेडसे, प्रा.एस.टी.पाटील, प्रा.एस.एस.तडवी, टी.एन. पाडवी, व्ही.डी.पाडवी,श्रीमती एम.एम. पाडवी,पी.जे.पटेल, एस.व्ही. देसले,पदवीधर शिक्षक एल.टी.महिंद्रे,बी.एस.तडवी,ए. व्ही. पवार,अधीक्षक डी.ए.बेडसे,प्रयोग शाळा परिचर डी. बी.मोरे, आर.जी.तडवी, रमेश पावरा, वस्तीगृह कर्मचारी,तसेच जामीया बी.एड.महाविद्यालयाचे छात्राध्यापक उपस्थित होते आभार प्रदर्शन शिलेश गावित यांनी केले, सांस्कृतिक विभाग प्रमुख एन. आर.जावरे, प्रा. हितेश पटेल, ए.टी. वळवी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.








