म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील कोठली त.सा.आणि वडाळी गावात वंचित बहुजन युवा आघाडी शाखा फलक अनावरण कार्यक्रम संपन्न झाला.
नंदुरबार युवा आघाडी तर्फे शहादा तालुक्यातील कोठली त सा व वडाळी या गावात वंचित बहुजन युवा आघाडीचे शाखा फलक अनावरण सोहळा संपन्न झाला.
यावेळी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अरुण रामराजे व जिल्हाध्यक्ष डी.बी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम सोहळा पार पडला तसेच .हा कार्यक्रम सुनिल सुर्यवंशी युवा जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला होता, यावेळी युवा जिल्हा उपाध्यक्ष रवी मोरे,महासचिव प्रकाश आगळे,उपाध्यक्ष राहुल इंदावे,कोषाध्यक्ष राहुल शिरसाठ,जिल्हा सचिव हिम्मत निकम,कृष्णा कोळी उपाध्यक्ष,तालुका महासचीव ज्ञानेश्वर कोळी कार्यक्रमाला समस्त आजी माजी पदाधिकारी ,कार्यकर्ते ,सदस्य उपस्थित होते.








