तळोदा l प्रतिनिधी
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षक होते सांगत इतिहासावर विवादित वक्तव्य केल्याने भारतीय जनता पक्ष तर्फे त्यांच्या पूतळ्याचे दहन करण्यात आले.
भारतीय समाज मनाचे मानबिंदू ,मराठी मनाचे राजे, हिंदू धर्माभिमानी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचा अवमान करणाऱ्या राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा जाहीर निषेध तळोदा येथील भाजपा आमदार कार्यालयासमोर भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ शशिकांत वाणी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत, अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देत,
त्यांचा प्रतिमेला काळे फासून , पूतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.व श्री पवार यांनी जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, भाजप शहराध्यक्ष योगेश चौधरी,भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष शिरीषकुमार माळी, कैलास चौधरी,गौरव वाणी, राजेंद्र राजपुत, योगेश चव्हाण,नगरसेवक सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.








