नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा काही दिवसापूर्वी दुसऱ्यांदा कोरोनामुक्त झाला असताना दि.७ सप्टेंबर रोजी तालुक्यातील नळवे येथे कोरोना रुग्ण आढळला होता.आज पुन्हा नंदुरबार शहरात कोरोना रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात काही दिवसापूर्वी दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.त्यामुळे दुसऱ्यांदा जिल्हा कोरोनमुक्त झाला होता.त्यानंतर
दि.७ सप्टेंबर रोजी तालुक्यातील नळवे येथे कोरोना रुग्ण आढळला होता. आज प्रशासनाने 174 जणांची आरटीपीसीआर चाचणी केली पैकी नंदुरबार शहरातील हरचंद नगर येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह
आला.आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यात 37 हजार 534 रुग्ण आढळले आहेत.त्यात नंदुरबार तालुक्यात 15 हजार 958, शहादा तालुक्यात 1 हजार 638, तळोदा तालुक्यात 3 हजार 719 , नवापूर तालुक्यात 4 हजार 111, अक्कलकुवा तालुक्यात 1 हजार 196 , धडगाव तालुक्यात 862 कोरोना रुग्ण आढळले आहेत.पैकी 36 हजार 586 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.तर जिल्ह्यात आतापर्यंत 950 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दीत न जाता शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत, आपली व कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे.
Public mirror news मुळे लोकांपर्यंत ताज्या बातम्या पोहचतात , जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांचे वृत्त public mirror news मुळे जनते पर्यंत वेगाने पोहचते,
त्यामुळे आम्हीupdate राहतो
तुमच्या या कार्याला सलाम