Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती शासन ,  राज्य सरकार हे १५ फेब्रुवारीपर्यंत कोसळण्याची शक्यता  : प्रसिद्ध विधीज्ञ ॲड.असीम सरोदे 

team by team
January 3, 2023
in राज्य
0
न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती शासन ,  राज्य सरकार हे १५ फेब्रुवारीपर्यंत कोसळण्याची शक्यता  : प्रसिद्ध विधीज्ञ ॲड.असीम सरोदे 
नंदुरबार | प्रतिनिधी
सध्या देशासह राज्याची राजकीय परिस्थिती पाहता प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. राजकीय घडामोडीत प्रत्येक पक्ष आपलीच भुमिका योग्य असल्याचे स्पष्टीकरण देतो. मात्र, या सार्‍या प्रकारात राजकीय पक्ष मतदारांना गृहित धरतात. म्हणूनच मतदारांचीही बाजू न्यायालयाकडून ऐकली गेली पाहिजे यासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली असून ती मान्यही झाली असल्याची माहिती पुणे येथील प्रसिद्ध विधीज्ञ ॲड.असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, राज्यात स्थापन झालेले सरकार हे घटनाबाहय असून १५ फेब्रुवारीपर्यंत हे सरकार कोसळून राष्ट्रपती शासन लागेल असे भाकितही त्यांनी यावेळी केले.
ऍड.असीम सरोदे हे न्यायालयाच्या कामकाजानिमित्त नंदुरबारला आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ऍड.सरोदे म्हणाले, सहा महिन्यांपासून राज्यात सत्तासंघर्ष पहायला मिळत आहे.
यावेळी ॲड.सरोदे पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन प्रक्रियेबाबत सध्या पाच न्यायाधिशांचे घटनापीठ आहेे. ते सात न्यायाधिशांचे असणे आवश्यक आहे. याबाबत अनेक विधिज्ञांनी तशी मागणी देखील केली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासारखी परिस्थिती यापूर्वी कधीही निर्माण झालेली नव्हती. असे असले तरी भारतीय संविधानाच्या दहाव्या परिशिष्टातील कलम २ (१) (ए) नुसार स्पष्टपणे पक्षविरोधी कारवाया केल्या असतील तर त्यांना अपात्र ठरविले जाण्याची शक्यता आहे.
यामुळे येत्या काळामध्ये साधारणत: १५ फेब्रुवारीपर्यंत याबाबतचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. त्यानंतर कदाचित राज्यात राष्ट्रपती राजवट देखील लागेल, असेही ॲड.सरोदे म्हणाले. दरम्यान, राज्यात विविध राजकीय पक्षातील नेत्यांकडून महापुरुषांबाबत केल्या जाणाऱ्या बेताल वक्त्यव्याबाबत कायदा असणे गरजेचे आहे. अनेक राजकीय पक्षाचे नेते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करत असल्याचे ॲड.सरोदे म्हणाले. यापुढे ते म्हणाले, आचार आणि विचारसंहिता निवडणूकीपूरती न राहता निवडून आलेल्या व्यक्तीवर पूर्ण पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत बंधनकारक असण्याची अपेक्षा आहे.
राजकीय नेता संवैधानिक वागत नसेल तर त्याच पक्षातील इतर नेते त्यांचा आदर्श घेवून असंवैधानिक बोलत असल्याचे याबाबत वेगळा कायदा होण्याची गरज आहे.असे सांगत न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास कायम आहे. असे असले तरी आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने अनेकदा लढा देण्यासाठी मध्यमवर्गीयांना अडचणी येतात. यामुळे सद्यस्थितीत अन्याय सहन करणाऱ्यांमध्ये मध्यम वर्गीयांचा मोठा गट आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे संपूर्ण कामकाज संगणकीकृत झाले आहेे. तसे महाराष्ट्रातील उच्च न्यायालयाचे कामकाज देखील ऑनलाईन होणे आवश्यक असल्याने यासाठी येत्या काळामध्ये जनहीत याचिका दाखल करणार असल्याचे ॲड.सरोदे म्हणाले. यावेळी ॲड.विक्रांत दोरकर उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

चांगल्या कामाची पावती : प्रभागातील मतदारांनी कार्यकाळ संपलेल्या नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व नगरसेविका सौ. अनिता परदेशी यांचा केला सत्कार

Next Post

विजापूर येथे सात जणांना मारहाण, २५ जणांविरोधात गुन्हा दाखल

Next Post
वाहनाची दुचाकीला धडक, तरुण जखमी

विजापूर येथे सात जणांना मारहाण, २५ जणांविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add