नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील कोकणीहिल परिसरात चोरट्यांनी घरफोडी करीत सुमारे सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास केला.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील कुमूदिनी थॉमसन नाईक यांचे कोकणी हिल परिसरात घर क्र.५६ आहे. सदर घरात चोरट्याने प्रवेश करुन बेडरुममधील कपाटात असलेले ३ लाख २४ हजार रुपये किंमतीचे ९८ ग्रॅम सोन्याचे दागिने व ६० भार चांदीचे दागिने चोरुन नेले.
याबाबत कुमूदिनी नाईक यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गोकुळ गुंजाळ करीत आहेत.








