Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार पोलीसांची निराधारांना माणुसकीची उब, ब्लॅंकेट वाटप करुन नववर्ष केले साजरे

team by team
January 1, 2023
in सामाजिक
0
नंदुरबार पोलीसांची निराधारांना माणुसकीची  उब, ब्लॅंकेट वाटप करुन नववर्ष केले साजरे

नंदूरबार l प्रतिनिधी

अवघे जग सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करीत असताना नंदुरबार पोलीसांनी वेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले आहे.

नविन वर्षाचे स्वागतानिमित्त कोठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीसांकडून बंदोबस्त लावण्यात येतो. नंदुरबार पोलीसांनीही दि.३० व ३१ डिसेंबर रोजी दिवसा व रात्री नाकाबंदी व गस्तीचा बंदोबस्त लावला होता. स्वतः पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील व अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह बहुतांशी अधिकारी रस्त्यावर होते. सध्या जिल्ह्यात कडाक्याची थंडी असल्याने जागोजागी रस्त्याच्या कडेला, बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन या ठिकाणी गरीब, निराधार, फिरस्ते व भिक्षुक थंडीत कुडकुडत उघड्यावर झोपल्याचे गस्तीवरील पोलीस अधीक्षक यांच्या लक्षात आले.

त्यांनी तात्काळ आपले सहकाऱ्यांशी सल्लामसलत करुन काही सामाजिक संस्थांच्या मदतीने ब्लॅंकेट उपलब्ध केल्या. जिल्हाभरात शेकडो गरीब व निराधारांच्या अंगावर पोलीस अधिकारी व अंमलदारांनी त्या स्वतःच्या हातांनी पांघरल्या.अशा अनोख्या पद्धतीने नंदुरबार पोलीसांनी नविन वर्षाचे स्वागत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
दरवर्षी हिवाळयात थंडीने मृत्यू पावणारांची संख्या मोठी आहे.अशावेळी पोलीसांना दुःखी मनाने मृतदेहाचे पंचनामे करावे लागतात त्यापेक्षा गरुजूंना पांघरुन देऊन हे पुण्याचे काम करताना आनंद व समाधान वाटल्याचे नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस अंमलदारांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा पोलीसांची विशेष मोहिमेत मद्यपी वाहन चालकाविरुध्द् दोन दिवसांत १४१ गुन्हे दाखल

Next Post

सूर्यनमस्कार घालून श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले नवीन वर्षाला वंदन

Next Post
सूर्यनमस्कार घालून श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले नवीन वर्षाला वंदन

सूर्यनमस्कार घालून श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले नवीन वर्षाला वंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026
नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

February 26, 2026
शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

February 26, 2026
नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

February 26, 2026
प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add