नंदूरबार l प्रतिनिधी
येथील श्रीमती डी. आर. हायस्कूल येथे नुकतेच कलाविष्कार 2022 हे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. विद्यार्थ्यांमधील कलाकारांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सदर उपक्रम हा राबवला जात असतो.
या कलाविष्कारातूनच वाचन संस्कृती रुजवण्याचा अभिनव उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री नारायण भदाणे यांनी राबवून सर्वांना आश्चर्यचकित केले. कलाविष्कार 2022 या वार्षिक स्नेहसंमेलनात सहभागी असणाऱ्या सर्व 250 विद्यार्थ्यांना ‘श्यामची आई’ हे पूज्य साने गुरुजी लिखित पुस्तक त्यांच्या वैयक्तिक खर्चातून विद्यार्थ्यांना देण्यात आले व मी वाचलेले पुस्तक यावर आधारित स्पर्धा 15 दिवसानंतर घेण्यात येण्याचे जाहीर करून विद्यार्थ्यांना त्यांनी वाचलेल्या पुस्तकात काय समजले ? पुस्तकाचे लेखकाचे मत… पुस्तकाचा गाभा किंवा स्वतः प्रेरित झाले असे विचार पंधरा दिवसानंतर सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचे आवाहन मुख्याध्यापक यांनी केले.
सदर अभिनव व अद्वितीय अशी कल्पना मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांसमोर मांडल्यामुळे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी या अभिनव उपक्रमाचे स्वागत केले व मुख्याध्यापकांच्या सूचनेला प्रतिसाद दिला. या अभिनव उपक्रमामुळे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाशय मुख्याध्यापक नारायण भदाणे यांचे अभिनंदन करून उपक्रम तडीस नेण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.