Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यातील दोन प्रकल्पांची राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेतसाठी निवड

अहमदाबाद येथे २७ ते ३१ जानेवारी दरम्यान विद्यार्थी करणार सादरीकरण

team by team
January 1, 2023
in राष्ट्रीय
0
नंदुरबार जिल्ह्यातील दोन प्रकल्पांची राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेतसाठी निवड
नंदुरबार   | प्रतिनिधी
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन १० ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी दरवर्षी होत असते यंदा लहान गटातून (१० ते १४ वर्षे) कु.शौर्या समर्थ व मृणाली चव्हाण यांच्या डेग्यूंचा डासांवरील पपई पासून बनविलेले औषध तसेच मोठया गटातून १४ ते १७ वर्षे अनुष्का शाह, संधिनी गांगुर्डे यांचा नंदुरबार जिल्ह्यासाठी सुर्यफुलाची शेती करण्याची आवश्यकता या प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. दि.२७ ते ३१ जानेवारी २०२३ येथे अहमदाबाद येथे होणार्‍या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व या बालवैज्ञानिक करणार आहेत. अशी माहिती वात्सल्य सेवा समितीचे अध्यक्ष पंकज पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी श्री.पाठक पुढे म्हणाले कि, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन १० ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी दरवर्षी होत असते. या परिषदेत दोन मुलांच्या गटातर्फे दिलेल्या विषयावर लघुसंशोधन प्रकल्प सादर केले जातात. शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने राज्य स्तरावर जिज्ञासा ट्रस्ट ठाणे ता.नंदुरबार जिल्हास्तरावर विज्ञान पर्यावरण क्षेत्रात कार्य करणार्‍या वात्सल्य सेवा समितीतर्फे हा उपक्रम राबविला जातो. यंदा होणार्‍या ३० व्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी मुख्य विषय स्वास्थ आणि कल्याणासाठी परिसंस्था समजून घेणे असा आहे.
या मुख्य विषयावर पाच उपविषयांवर नंदुरबार जिल्ह्यातून २६८ प्रकल्पांची नोंदणी जिल्हास्तरावर झाली होती. शिक्षकांच्या विज्ञान शिक्षक कार्यशाळा तालुकाशा शाळांवर जावून शिक्षक विद्यार्थ्यांबरोबर केलेल्या संवाद कार्यक्रमामुळे यंदा अभूतपुर्व प्रतिसाद दिला.
वात्सल्य सेवा समितीतर्फे भारताच्या स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या आपल्या जिल्ह्यातून बाल वैज्ञानिक तयार व्हावे, संशोधनवृती लहानवयातच योग्य पध्दतीने विकसीत व्हावी, यासाठी संख्यात्मक व गुणात्मक स्तरावर कार्य केले गेले. ज्यात जैवविविधता विषय तज्ञ सौ.जुई पेठे (नाशिक) यांचे मार्गदर्शक शिक्षकांसाठीचे वर्कशॉप असेल किंवा डी.आर.हायस्कुल येथे नोंदणी केलेल्या बालविज्ञाकांनी प्रकल्प लेखन कसे करावे,
प्रकल्प विषयात पुढे केस जावे यासाठी शहरातील नामांकित आर्किटेक्चर हेमंत  चलियावाल, निरज देशपांडे, डॉ.निर्मल गुजराथी, डॉ.श्रुती शाह, जीटीपीचे प्रा.डॉ.अनिल कुलकर्णी, कृषी विज्ञान केंद्र कोळदे यांचे विषयतज्ञ सौ.आरती देशमुख, श्रॉफ हा यस्कुलचे प्रा.नितीन देवरे आदी विज्ञानप्रेमींचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मुलांना व त्यांच्या मार्गदर्शन शिक्षकांना देण्यात आले. संशोधनवृत्तीला घरातूनही प्रोत्साहन मिळावे यासाठी बाल वैज्ञानिकांच्या पालकांबरोबर डॉ.गजानन डांगे (राष्ट्रीय अध्यक्ष योजक) यांचा संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे.
या सर्व प्रयत्नातून १७ प्रकल्प यंदा राज्यस्तरावर निवडण्यात आली. या १७ प्रकल्पातून लहान गटातून (१० ते १४ वर्षे) कु.शौर्या समर्थ व मृणाली चव्हाण यांच्या डेग्यूंचा डासांवरील पपई पासून बनविलेले औषध तसेच मोठया गटातून १४ ते १७ वर्षे अनुष्का शाह, संधिनी गांगुर्डे यांचा नंदुरबार जिल्ह्यासाठी सुर्यफुलाची शेती करण्याची आवश्यकता या प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे.
दि.२७ ते ३१ जानेवारी २०२३ येथे अहमदाबाद येथे होणार्‍या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व या बालवैज्ञानिक करणार आहेत. हाच विषय पुढील वर्षही असल्याने पुढच्या वर्षीसाठी अधिक सहभाग होण्याचा प्रयत्न वात्सल्य सेवा समितीतर्फे होणार आहे. असे वात्सल्य सेवा समितीचे अध्यक्ष पंकज पाठक यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे स्पर्श नर्सिंग होमच्या नूतन इमारतीचे उद्या उद्घाटन

Next Post

डी. आर. हायस्कूल मध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी अभिनव उपक्रम

Next Post
डी. आर. हायस्कूल मध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी अभिनव उपक्रम

डी. आर. हायस्कूल मध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी अभिनव उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026
नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

February 26, 2026
शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

February 26, 2026
नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

February 26, 2026
प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add