Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

 नंदुरबार जिल्ह्यातून हंगामी स्थलांतर रोखण्यासाठी आराखडा तयार करणार : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

team by team
December 31, 2022
in राजकीय
0
ॲड.के.सी.पाडवी यांच्या उलट्या बोंबा : आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित

नागपूर  l

नंदुरबार जिल्ह्यातून आदिवासी कुटुंबांचे हंगामी स्थलांतर रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसह आराखडा तयार करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत सदस्य राजेश पाडवी यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री डॉ. गावित बोलत होते. डॉ. गावित यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून विविध योजनांतर्गत निधी उपलब्ध करून दिला जातो. गेल्या सहा वर्षांत नंदुरबार जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी २,१९२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार हमी योजनेतून रोजगार निर्मितीची कामे हाती घेण्यात आली आहेत. आदिवासी कुटुंबांना स्वत:चे कायमस्वरूपी पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आदिवासी घरकूल योजना, कृषी विभागाच्या माध्यमातून शेड नेट योजना तसेच सिंचनाच्या सुविधा, औजारे पुरविण्यात येत आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. आमचूर, सीताफळ, तेंदू पत्ता यावर आधारित लघु उद्योग, कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. शबरी घरकूल योजनेचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी २०१६- १७ ते २०२२- २३ या कालावधीत एकूण १५ हजार ४६ घरकूल मंजूर करण्यात आले आहेत, असेही मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य डॉ. देवराव होळी, हिरामण खोसकर आदींनी सहभाग घेतला.

बातमी शेअर करा
Previous Post

सावधान : मद्यपी वाहन चालकांवर होणार कारवाई : पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील

Next Post

बिलाडी येथे पत्नीवर कोयत्याने वार ; पतीविरोधात गुन्हा दाखल

Next Post
वाहनाची दुचाकीला धडक, तरुण जखमी

बिलाडी येथे पत्नीवर कोयत्याने वार ; पतीविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026
नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

February 26, 2026
शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

February 26, 2026
नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

February 26, 2026
प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add