म्हसावद l प्रतिनिधी
नागपुर हिवाळी अधिवेशनात पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या खाजगी व सेवा अंतर्गत काम करणाऱ्या पदविका धारक पशुवैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्या मान्य करण्याबाबत नागपूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यातील हजारो पशुवैद्यकीय उपस्थित होते.
विधानसभेच्या अध्यक्ष कक्ष दालनात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेतून मागण्या मान्य झाल्याचे संबंधित निर्गमीत आदेश अंमलबजावणी बाबत, अद्याप वरील विषयासंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याने राज्यातील पशुवैद्यकीय पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन सेवा संघ यांच्या वतीने हिवाळी अधिवेशनात यशवंतराव चव्हाण स्टेडियम नागपूर ते झिरो माईल दरम्यान विधानभवन नागपूर हिवाळी अधिवेशन दरम्यान पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन सेवा संघ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ.नारायण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी पशुवैद्यकीयांचा धडक मोर्चा व निदर्शने काढण्यात आली होती. या वेळी तसेच राज्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, राज्यातील पदविका धारक पशुवैद्यकांना काम करण्यासाठी कायदेशीर परवानगी देण्या बाबत मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र महाराष्ट्रात V. P.act 1971 व रेगुलेशन्स 1981 नुसार पशुवैद्यकीय परिषदेअंतर्गत पदविका धारकांना भाग -२ मध्ये नोंदणी प्रदान करण्यात येऊन स्वतंत्ररित्या पशु उपचार सेवा करता येत होती, त्याकडे राज्य शासनाने सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केले आहे, तरी संबंधित पशुसंवर्धन विभागाने तत्काळ सर्व मागण्या मान्य करुन राज्यातील दिड ते दोन लाख खाजगी पशुवैद्यक दिलासा द्यावा अशी प्रतिक्रिया पशुवैद्यकीय पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन सेवा संघ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ नारायण जोशी बोलताना म्हणाले, आमच्या हक्काच्या मागण्या या शासनाकडुन पूर्ण न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन व काम बंद केले जाईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
या प्रसंगी पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ महाराष्ट्र राज्य नंदुरबार अक्कलकुवा तालुका अध्यक्ष:डॉ. वसंत पाडवीतसेच नाशिक विभागीय संघटक डॉ. भरत पावरा पशुवैद्यकीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ महाराष्ट्र राज्य कार्यध्यक्ष डॉ. सागर आरुटे व इतर सभासद उपस्थित व इतर सभासद उपस्थित व राज्यातील अधिक पशुधन पर्यवेक्षक यांनी हिवाळी अधिवेशनात नागपुर येथील यशवंतराव चव्हाण स्टेडियम ते झिरो माईल दरम्यान जंगी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.








