Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वैजाली येथे शिक्षण परिषद उत्साहात 

team by team
December 29, 2022
in शैक्षणिक
0
वैजाली येथे शिक्षण परिषद उत्साहात 

म्हसावद  l प्रतिनिधी

 

 

शहादा तालुक्यातील प्रकाशा केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजाली येथे उत्साहात संपन्न झाली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व शहीद बालक्रांतिकारक शिरीषकुमार यांच्या प्रतिमीचे पूजन प्रकाशा बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी युवराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

 

यावेळी वैजाली गावाचे सरपंच सुरेखा ठाकरे, उपसरपंच गणेश पाटील, केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष प्रवीण पाटील, मुख्याध्यापक सुदाम पाटील, पंचायत समिती शहादा बीआरसी विषयतज्ञ मिलिंद देसले, केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे अधीव्याख्याता डॉ. वनमाला पवार यांनी शिक्षण परिषदला भेट देऊन मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थी हा ज्ञानाचा अथांग महासागर आहे. थोर विद्वान, ज्ञानाचा वारसा पुढे चालवण्याचा ज्ञानवंत करण्याचा गुणवत्ताचा खजिना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला पाहिजे असे मत व्यक्त केले. जिल्हास्तरावरून देण्यात आलेला माहे सप्टेंबर – नोव्हेंबर २०२२ चा मागोवा व्हिडीओ पीपीटी पाहून विषय उजळणी केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांनी करून दिली.

 

 

 

 

जिल्हास्तरावरून देण्यात येणाऱ्या पीपीटीवर सविस्तर चर्चा करून ज्या अध्ययन निष्पत्ती मध्ये विद्यार्थी मागे आहेत. भाषा व गणित  अध्ययननिष्पत्ती घेऊन गटकार्याच्या माध्यमातून त्यावर चर्चा करून  दिलेल्या नमुन्यांच्या आधारे नियोजन दर्पण भामरे यांनी दिली व अध्ययननिष्पत्ती आधारित तयार केलेले नियोजन गटाने सादर करावे . देण्यात आलेली पीपीटी द्वारे प्रभावी वर्गप्रक्रिया व वर्गरचना हा विषय समजून घेऊन यादृष्टीने वर्गपातळीवर याचे नियोजन कसे करता येईल याबाबत विस्तृत चर्चा करून दिशा महेशकुमार चौधरी यांनी दिली. जिल्हास्तरावरून देण्यात येणाऱ्या पीपीटीच्या मार्गदर्शक मुद्द्यांच्या आधारे, तालुकास्तर डाएने केलेल्या मार्गदर्शनानुसार नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आधारीत एका पाठाचे सादरिकरण उमेश विसपुते यांनी सादरीकरण केंद्रात झाले. दिक्षा अँपची माहिती दिली. जिल्हास्तरावरून देण्यात येणाऱ्या पीपीटी नुसार केंद्रात पालक परिषद प्रक्रिया अंमलबजावणी झालेल्या किमान दोन शाळांनी पीपीटी मध्ये दिलेल्या मुद्द्यानुसार पालक परिषद प्रक्रियेसंदर्भात अनुभव सादरीकरण  केले. केंद्रप्रमुख आणि सिआरजी सदस्य यांनी एकत्रित सिआरजी बैठक घेऊन केंद्रातील चांगल्या बाबी व अडचणींवर चर्चा करून पुढीलपैकी एक विषय, केंद्र गरजा आधारित विषय ठरवण्यात आला. व चर्चा केली.

 

 

 

 

 

 

निपून भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण बाबत विश्वास माळी यांनी दिली. प्रशासकीय कार्य विषयी शिक्षण विस्तार अधिकारी युवराज मोरे यांनी गतिमानता, उपस्थिती, व रेकार्ड आद्ययावत, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नोंदी, शाळाबाह्य विद्यार्थी गुणवत्ता शिक्षण याविषयी माहिती दिली. शिक्षण परिषद प्रतिसादाची एकच लिंक असून केंद्रप्रमुख व शिक्षण परिषदेस उपस्थित राहणारे अधिकारी, कर्मचारी, स्वंयसेवी संस्था प्रतिनिधी , शिक्षक,  मुख्याध्यापक यांच्यासाठी लिंक अभिप्राय गुगल लिंक ह्याच दिलेल्या वेळेत भरण्यात आली. शिक्षण परिषदचे प्रास्ताविक उषा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार चंदू पाटील यांनी केले. शिक्षण परिषद संपन्न होण्यासाठी मुख्याध्यापक सुदाम पाटील, शिक्षक भरत पावरा, राजू मोरे, चंदू पाटील, उषा पाटील, गोपाल गावीत यांनी परिश्रम घेतले.

 

बातमी शेअर करा
Previous Post

शालेय टेनीक्वाईट स्पर्धेत डी.आर. हायस्कूल चा संघ राज्यस्तरावर

Next Post

अपयश ही यशाची पहिली पायरी : प्राचार्या नुतनवर्षा वळवी

Next Post
अपयश ही यशाची पहिली पायरी : प्राचार्या नुतनवर्षा वळवी

अपयश ही यशाची पहिली पायरी : प्राचार्या नुतनवर्षा वळवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add