नंदूरबार l प्रतिनिधी
भारतीय मानवाधिकार रक्षा परिषदेच्या महाराष्ट्र राज्याच्या सहाय्यक सचिवपदी प्रा.हितेंद्र सतीश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली.
प्रा.हितेंद्र चौधरी हे अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, धार्मिक, राजकिय क्षेत्रात कार्यरत आहेत. ते अखिल भारतीय युवा गुर्जर महासभा महाराष्ट्र राज्याचे माजी उपाध्यक्ष, महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय पाडळदाचे सचिव, व्हीएसजीजीएम सदस्य, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रा.हितेंद्र चौधरी यांना अनेक संघटनांच्या पदावर काम करण्याचा त्यांना प्रदिर्घ अनुभव आहे.
प्रा.हितेंद्र सतीश चौधरी यांची नीती आयोग द्वारा नोंदणीकृत भारतीय मानवाधिकार रक्षा परिषदेच्या महाराष्ट्र राज्याच्या सहाय्यक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे आदेश निवृत्त न्यायाधीश व ग्राहक मंचाचे माजी अध्यक्ष ब्रिन्दावन मंडल यांच्या सल्ल्याने व ग्राहक मंचाचे चेअरमन जनार्धन मोंडल आणि नीती आयोगाचे सरचिटणीस चंद्रशेखर डे, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ.प्रफुल्ल पाटील यांच्याद्वारे नियुक्ती करण्यात आली.
मानवाधिकार आयोगाला प्राप्त होणार्या ५० टक्के तक्रारीपैकी कार्यक्षेत्रात न बसणार्या काही तक्रारी असतात या नॉन मेन्टेनेबल तक्रारी संदर्भात जनजागृती करणे, मानवी हक्काचे ऊल्लंघन झालेल्या प्रकरणांची जवाबदार यंत्रणेला दखल घेण्यास मदत करणे किंवा भाग पाडणे,मानवतेचा व मानवी हक्काच्या प्रचार करणे आदी कार्य या माध्यमातून केले जातात. प्रा.हितेंद्र चौधरी हे पत्रकार डॉ.सतिष चौधरी यांचे पूत्र आहेत.








