नंदुरबार| प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील नगारे येथे नळाला पाणी सोडले नाही. या कारणावरून ग्रामपंचायत शिपाईला जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांविरूध्द विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील नगारे येथील ग्रामपंचायतीत केनीया वसावे हा शिपाई म्हणून काम पाहतो. त्याने विपुल नाईक यांच्या गल्लीतील पाणी सोडले नाही या कारणावरून विपुल नाईक व इतर तिघांनी केनीया वसावे यांना जिवेठार मारण्याचा उद्देशाने डोक्यावर पोटावर पाठीवर व हातापायांना मारून दुखापती केली व वाईर्ट शिवीगाळ करून जिवेठार मारण्याची धमकी दिली.
म्हणून केनिया विजय वसावे रा.नगारे ता.नवापूर याच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात विपुल दिलीप नाईक, अमिर दिलीप नाईक, संग्राम दिलीप नाईक, दिलीप शांतु नाईक सर्व रा.नगारे ता.नवापूर यांच्या विरूध्द भादंवि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई भूषण बैसाणे करीत आहेत.








