तळोदा l
पालिका रस्ता भुमीपूजन कार्यक्रमाचा फलकावरून बांधकाम सभापती व भाजपचा नगरसेविका नाव गायब म्हणजेच पालिका निवडणुक पुर्व शह काटशहचा राजकारणाची नांदी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सूरू झाली आहे.
शहरातील रस्ता कामासाठी एक कोटी रूपयाचा निधी मंजूर झाला आहे.पालिकेची पंचवार्षिक मूदत संपण्याआधी भूमिपूजन होणे अपेक्षित होते. स्थानिक सत्ताधारी मंडळी कडुन तसे प्रयत्न ही झाले.पालिकेत सत्ता भाजपची असली तरी बांधकाम सभापती तत्कालीन काँग्रेस व विद्यमान राष्ट्रवादीचा असल्याने रस्ते कामाचे उद्घाटन त्यांचा अधिपत्याखाली करावे लागले असते, तसेच केंद्रात, राज्यात व जिल्ह्यात व पालिकेत भाजपची सत्ता असताना, अनूप उदासी पत्नी भाजपची नगरसेविका असताना शिंदे गटात गेल्याने भाजपा पदाधिकारींनी यांना दूर ठेवण्यासाठी,त्यांची नावे विकास कामांचा फलकांवर येऊच नये यासाठी पालिकेची मूदत संपल्यानंतर दूस-याच दिवशी रस्ता उद्घाटनाचा नारळ फोडत पालिकेतल्या दोन्ही पदाधिकारींना दूर ठेवत राजकीय विरोधाची ठेणगी पेटवली आहे.
रस्ता कामाचा शूभारंभासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावीत, खासदार डॉ हिना गावीत, जिल्हापरिषद अध्यक्षा सूकेशिनी गावीत,मावळते नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा सौ भाग्यश्री चौधरी,नगरसेवक भाजपाचे पदाधिकारी, काँग्रेस सोडून भाजप प्रवेश केलेले नगरसेवक उपस्थित होते.
तळोदा पालिकेचा वतीने रस्ता कामाचा उद्घाटन कार्यक्रमाचे फलक बनविण्यात आले होते. त्यात पालिका प्रशासन कडून लावण्यात आलेल्या फलकावर काँग्रेसचा चिन्ह वर निवडलेले व सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात असणारे हितेंद्र क्षत्रिय पालिकेत भाजपचे बहुमत असताना माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे नेते उदेसिंग पाडवी यांची राजकीय खेळी मुळे विषय समिती निवडीत बांधकाम सभापती निवडून आले होते.
तसेच भाजपचा चिन्हावर निवडून आलेल्या सुनयना उदासी यांचे पती अनुपकुमार उदासी यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे . या दोघांचा राजकीय भूमिकेमूळेच भाजपाने प्रशासनाला हाताशी धरुन,पालिकेचा कामांचे भूमिपूजन असतांना,प्रशासन कडून लावण्यात आलेल्या फलकावर नावे येणार नाहीत अशी व्युहरचना करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सूरू आहे.निवडणुकपूर्व वातावरण तापायला लागले असून,शहकाटशहाचा राजकारण रंगू लागले आहे. पालिका दोन पदाधिकारी ची नावे वगळण्या मागील सूत्रधार कोण? नेमके नाव कोणी काढले? भाजपात प्रवेश केलेल्यांना जवळ आणि विरोधी पक्षातल्यांना लांब ठेवून राजकीय खच्चीकरण कोण करत आहे.याबात राजकीय भविष्यकारांमध्ये चर्वितचर्वण सूरू आहे.








