नंदुरबार | प्रतिनिधी
येथील विद्यासरोज हॉस्पिटलचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य रोग निदान शिबीर दि.२७ ते २८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ३ वाजदरम्यान आयोजीत करण्यात आले आहे.
नंदुरबार येथील विद्यासरोज क्रिटीकल केअर हॉस्पिटल पोस्ट ऑफीस शेजारी, डॉ.अंधारे स्टॉप येथे प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य रोग निदान शिबीर दि.२७ ते २८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ३ वाजदरम्यान आयोजीत करण्यात आले आहे.
या शिबीरात ओपीडी व मार्गदर्शन, ई.जी.सी., पी.एफ.टी, शुगर तपासणी, बी.पी.तपासणी, फिजिओथेरेपी मार्गदर्शन सर्व प्रकारच्या रक्त तपासणी सलवत दर ५० टक्के सुट राहिल. शिबीरात उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.गौरव अशोक तांबोळी, डॉ.स्वप्निल मधुकर महाजन, डॉ.विधी पाटील ,तांबोळी व कर्मचारी वृंद, ऊर्जा थेरपी क्लिनीक, निदानगंगा डायग्नोटिक्स सेंटर यांनी केले आहे.








