नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचा निकाल तब्बल १२ तासांनी जाहीर झाला असून भरत गावित पुरस्कृत परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला असून आ. शिरीष नाईक यांच्या सह पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल पराभूत झाले आहे.

नवापूर तालुक्यातील आदिवासी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तीस वर्षांपूर्वी सहकारी तत्त्वावर माजी मंत्री स्वरूपसिंग नाईक. आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्याची मुहूर्त मोड रोवली गेली. डोकारे आदिवासी साखर कारखान्यात गेली २५ वर्षे मंडळाची निवड बिनविरोध होत होती. परंतु नवापूर तालुक्यात राजकीय पक्ष अदलाबदलांमुळे साखर कारखान्यावरही. यंदा भाजप नवापूर तालुका अध्यक्ष भरत माणिकराव गावित. यांनी परिवर्तन पॅनल उभे करून निवडणूक लढवली. काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक यांच्या शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली.
२४ डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर २५ डिसेंबरला मतमोजणी झाली. बॅलेट पेपर द्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करण्यासाठी तब्बल १२ तासांचा अवधी लागल्याने निकाल उशिरा जाहीर झाले.
डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना मंडळात १७ संचालक पदांची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये शिरीष नाईक पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे २ उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले होते. परिवर्तन पॅनलचे १४ उमेदवार रिंगणात होते. शेतकरी विकास पॅनलचे १५ उमेदवारांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खा.डॉ.हिना गावीत, जि. प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत, माजी आ. शरद गावित, नवापूर भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावित यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात आलेले परिवर्तन पॅनलचे १४ उमेदवार विजयी झाले आहे.
तर दुसरीकडे माजी मंत्री स्वरूपसिंग नाईक व त्यांचे पुत्र आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल साखर कारखाना मंडळात सत्ता स्थापनेपासून पराभूत झाले आहे.
गेली २५ वर्षे माजी मंत्री स्वरूपसिंग नाईक व आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या परिवाराने डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर संचालक पदी विराजमान होऊन सत्ता चालवली. यात आदिवासी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य नाय देऊ शकले नाही. गेल्या काही वर्षापासून सदर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास दुसऱ्या व्यक्तीला दिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर न देणे, ज्या शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यात दिला आहे त्यांना वेळेत पैसे न देणे, ऊस वाहतूकदार व ऊसतोड मजूर यांनाही वेळेत पैसे न मिळाल्याने अनेक वेळा या ठिकाणी आंदोलनेही झाली.
डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर गेली २५ वर्षे सत्ता चालवत असलेल्या संचालक मंडळांवर ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार व मजूर यांची नाराजी असल्यामुळेच आ. शिरीष कुमार नाईक पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल पराभूत झाले आहे. तर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व कारखान्यात परिवर्तन बदल घडवून आणण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, माजी आ. शरद गावित, नवापूर भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावित यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात आलेल्या परिवर्तन पॅनलचे १४ उमेदवार विजयी झाले असून. डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर परिवर्तनाची लाट आली आहे. परिवर्तन पॅनलचे सर्व १४ सीट निवडून आल्याने माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय माणिकराव दादा गावित यांना खरी श्रद्धांजली मतदारांनी वाहिली असून. सर्व शेतकरी मतदार बंधूंचे भरत गावित यांनी आभार व्यक्त केले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सहायक निबंधक भारती ठाकूर, सहायक निवडणूक अधिकारी निरज चौधरी, क्षेत्रीय अधिकारी सचिन खैरनार तसेच पोलीस प्रशासनातर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या वतीने मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात आली.
दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस प्रशासनाच्या कडक बंदोबस्तामुळे प्रसार माध्यम प्रतिनिधींना आत मध्ये जाण्यास मनाई असल्याने. तब्बल बारा तास पेक्षा अधिक काळ बाहेर ताटकळत उभे राहून बातमी कव्हर करण्यासाठी दमछाक झाल्याने. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार
नवागांव गट-हरिदास जेसा गावीत (२५९६),
नवापूर गट-आलु होण्या गावीत (२४७१),
देवराम वसंत गावीत (२४२२)
भरत माणिकराव गावीत (२४०९)
विसरवाडी गट- बकाराम फत्तेसिंग गावीत (२५६८)
रमेश जाण्या गावीत (२४९१)
खांडबारा गट- लक्ष्मण धेडू कोकणी (२५०१)
रावजी कातक्या वळवी (२४४१)
नंदुरबार गट- जगन चंद्रा कोकणी(२५६१),
रुद्राबाई धरमसिंग वसावे (२४७३)
महिला गट- मीराबाई पारत्या गावीत (२५०२)
संगीता भरत गावीत (२४९०)
अनुसूचित जाती जमाती गट- सीताराम शंकर ठाकरे (२६०२)
भटक्या विमुक्त जाती – रमेशचंद्र धनसुखलाल राणा (२६४४)
शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार
नवागांव गट- विनोद बाळू नाईक (२३४४)
संस्था गट- अजित सुरुपसिंग नाईक (बिनविरोध)
इतर मागास वर्ग- आरीफभाई बलेसरिया (बिनविरोध)








