नंदूरबार | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यांतील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीत १५ संचालकांसाठी मतदान प्रक्रिया मतपञीके व्दारे पार पडलेल्या निवडणुकीत ५३.९६ टक्के मतदान झाले होते.आज झालेल्या मतमोजणीत भरत गावीत यांच्या नेतृत्वात लढवलेल्या परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवित तब्बल १४ जागांवर विजय मिळविला आहे.
मागील २५ वर्षांची काँग्रेसची एकहाती सत्ता असलेल्या डोकारे आदिवासी कारखान्यावर भाजपाचा झेंडा फडकला आहे.
नवापूर तालुक्यांतील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना स्थापनेपासून पाच वेळा बिनविरोध झाली होती.मात्र आता सहावी पंचवार्षिक निवडणुकीत मतदान घेण्यात आले.
१७ पैकी शेतकरी विकास पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध झाले होते. तर १५ जागांसाठी मतदान झाले. आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित व भरत माणिकराव गावित निवडणुकीत दोन गावित परिवार एकत्रित आले होते. त्यांचे परिवर्तन पॅनलने निवडणुकीत कंबर कसले होते तर माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांचे पुत्र आमदार शिरीशकुमार नाईक यांनी सर्व ताकद लावून सत्ता कायम राहण्यासाठी कसून प्रयत्न सुरू केले होते. या निवडणुकीत गावित आणि नाईक परिवार आमने-सामने उभे असून सत्ता कोण काबीज करतो याकडे सर्व जिल्हा वासियांचे लक्ष लागून होते.
पंचवार्षिक निवडणुकीत १५ संचालकांसाठी मतदान प्रक्रिया मतपञीके व्दारे पार पडलेल्या निवडणुकीत ५३.९६ टक्के मतदान झाले होते.आज झालेल्या मतमोजणीत भरत गावीत यांच्या नेतृत्वात लढवलेल्या परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवित तब्बल १४ जागांवर विजय मिळविला आहे.मागील २५ वर्षांची काँग्रेसची एकहाती सत्ता असलेल्या डोकारे आदिवासी कारखान्यावर भाजपाचा झेंडा फडकला आहे.संस्था या गटातून अजित सुरुपसिंग नाईक यांची बिनविरोध निवड झाली. इतर मागासवर्गातून आरीफभाई बलेसरिया यांची बिनविरोध निवड झाली होती.
तर यावेळी परिवर्तन पॅनलचे उमेदवार नवागांव गटातून हरिदास जेसा गावीत, नवापूर गटातून आलु होण्या गावीत, देवराम वसंत गावीत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत माणिकराव गावीत,विसरवाडी गटातून बकाराम फत्तेसिंग गावीत, रमेश जाण्या गावीत, खांडबारा गटातून लक्ष्मण धेडू कोकणी, रावजी कातक्या वळवी, नंदुरबार गटातून जगन चंद्रा कोकणी, रुद्राबाई धरमसिंग वसावेमहिला गटातून मीराबाई पारत्या गावीत, संगीता भरत गावीत, अनुसूचित जाती जमाती गटातून सीताराम शंकर ठाकरे,भटक्या विमुक्त जाती रमेशचंद्र धनसुखलाल राणा विजयी झाले.








